Headlines

डॉक्टरांना मिळेल एक युनिक ID:राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचा प्रस्ताव, एका नोंदणीने कुठेही प्रॅक्टिस करू शकतील, परवाना 5 वर्षांसाठी वैध

नॅशनल मेडिकल कमिशन (NMC) ने प्रत्येक नोंदणीकृत डॉक्टरांना केंद्रीय स्तरावर युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (UID) देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानुसार, एकदा राज्य वैद्यकीय नोंदणीमध्ये नोंदणी झाल्यानंतर डॉक्टरांना देशातील कोणत्याही दुसऱ्या राज्यात प्रॅक्टिस करण्यासाठी पुन्हा नोंदणी किंवा परवाना घेण्याची आवश्यकता भासणार नाही. हा प्रस्ताव डॉक्टरांच्या नोंदणी आणि प्रॅक्टिस परवान्याशी संबंधित 2026 च्या मसुदा नियमांमध्ये ठेवण्यात आला आहे….

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांच्या जिवाची कवडीचीही किंमत नाही का?:गडचिरोलीतील 3 बळींनंतर पळसन आश्रमशाळेच्या दुरवस्थेवरून वडेट्टीवारांचे सरकारवर टीकास्त्र

गडचिरोली येथील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेने राज्यातील आदिवासी आश्रमशाळांच्या सुरक्षेचा आणि दुरवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. याच पार्श्वभूमीवर, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील पळसन शासकीय आश्रमशाळेचा एक धक्कादायक व्हिडिओ शेअर करत राज्य सरकार आणि प्रशासनावर सडकून टीका केली आहे. “निष्पाप विद्यार्थिनींचे बळी जाऊनही हे निर्दयी सरकार आणि…

Read More

शहा म्हणाले- काँग्रेसचे पूर्ण वंदे मातरम न गाणे तुष्टीकरण:1937 मध्ये काँग्रेसने जो निर्णय घेतला, तो मोदींनी सुधारला

गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमचे फक्त दोन कडवे गाण्याच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेसने वंदे मातरम पूर्ण न गाणे हे तुष्टीकरण आहे. शहा म्हणाले- देशात तुष्टीकरणाचे राजकारण चालणार नाही. 1937 मध्ये काँग्रेसने जो निर्णय घेतला होता, तो पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतर सुधारला आहे. देशाची जनता त्याचा विरोध सहन…

Read More

लडाखमध्ये महिला पर्यटकाच्या वक्तव्यावर माजी लष्करी अधिकारी संतापले:म्हणाले- जवानही कर देतात; महिलेने म्हटले होते- तुमचा पगार आमच्या करातून येतो

लडाखमधील कारगिल जिल्ह्यात एका महिला पर्यटकाचा सुरक्षा दलांशी वाद घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. माजी लष्करी अधिकाऱ्यांनी गुरुवारी महिलेवर टीका केली आणि म्हटले की जवानही कर भरतात. त्यांनी सांगितले की लोकांनी जवानांचा आदर केला पाहिजे. खरं तर, बुधवारी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला लडाखमधील मिनामार्ग चेकपॉईंटवर रस्ता काही काळासाठी बंद करण्याला विरोध करत आहे. व्हिडिओमध्ये…

Read More

आराेप-प्रत्याराेप:शिंदे-नाईक संघर्षात आता ‘डेटा सेंटर’ आणि ‘टीडीआर’वरून वादाचा भडका, टीडीआर तब्बल 4,000 कोटी रुपयांचा असल्याचा दावा

टीडीआर प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यात वाद सुरू असतानाच आता ठाण्यातील प्रस्तावित “डेटा सेंटर’ आणि टीडीआर प्रकरणावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. गडकरी रंगायतन येथील जनता दरबारात बोलताना गणेश नाईक यांनी ठाणे महापालिका व प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. टीडीआर प्रक्रियेवर स्टे आणण्यासंदर्भात बोलताना, “स्टे देण्यास नक्कीच उशीर झाला, पण बैल…

Read More

पुण्यात 'एएनटीएफ'ची कारवाई:कोंढव्यात अडीच किलो गांजा जप्त; सराईतासह 30 जण ताब्यात, खरेदीदारांची कसून चौकशी

कोंढवा परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (ANTF) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अडीच किलो गांजा जप्त करण्यात आला असून, एका सराईत आरोपीला अटक करण्यात आली आहे. गांजा खरेदीसाठी आलेल्या सुमारे 30 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणी गणेश पाटोळे आणि आजू अहमद शेख यांना ताब्यात घेण्यात आले आहे….

Read More

कुंभमेळ्यासाठी प्रशासन ‘अलर्ट मोड’वर:नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन विरोधकांना म्हणाले- बेछूट आरोप करू नका, माहिती घेऊन बोला

नाशिक जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन यांनी पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत आगामी कुंभमेळा आणि विशेषतः त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या गर्दीच्या नियोजनावर त्यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विकासकामे, व्हीआयपी दर्शन आणि विरोधकांच्या आरोपांवर सडेतोड उत्तरे दिली. त्र्यंबकेश्वरमधील व्हीआयपी दर्शन बंद नुकत्याच आलेल्या सुट्ट्यांदरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिरात…

Read More

श्वेता तिवारीने ड्रिंक ऑर्डर केली, डिलिव्हरीमध्ये झुरळ आले:अभिनेत्री म्हणाली- तुकारामजी तुम्ही कुठे आहात; CJP चा जोरदार विरोध केला होता

श्वेता तिवारीने नुकतीच ऑनलाइन एनर्जी ड्रिंक ऑर्डर केली होती. जेव्हा ऑर्डर उघडली, तेव्हा त्यात झुरळ मिळाल्याने अभिनेत्री घाबरली. अभिनेत्रीने व्हिडिओ जारी करून महाराष्ट्रात अन्नसुरक्षा कारवाईमुळे चर्चेत असलेल्या FDA अधिकारी तुकाराम मुंढे यांना प्रश्न विचारला आहे. त्याचबरोबर एका फोटोद्वारे त्यांनी कॉकरोच जनता पार्टीवरही टोमणा मारला, ज्यांच्या आंदोलनाचा अभिनेत्रीने जोरदार विरोध केला होता. अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर केलेल्या…

Read More

भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी बीएलएच्या नियुक्तीवरून पदाधिकाऱ्यांना फटकारले:नाशिक येथे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागीय बैठक

मतदार यादी पुनरीक्षणासाठी राज्यात १ लाख ३६ हजार बूथ असून आतापर्यंत भाजपचे ९३ हजार बीएलए नियुक्त आहेत. अद्याप ४३ हजार बीएलएंची नियुक्ती बाकी असून ही चालढकल चालणार नाही, असा सज्जड दम देत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी नाशिकमधील विभागीय बैठकीत पदाधिकाऱ्यांना फटकारले. बूथबाहेर बसून निवडणुका जिंकता येत नाहीत. मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे, बूथवर…

Read More

अनैतिक संबंधांच्या वादातून खारमध्ये मजुराची हत्या:अल्पवयीन पुतण्यानेच केला काकाचा खून; सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला मृतदेह

खार पश्चिमेतील रोड क्रमांक 7 वर असलेल्या एका बांधकाम साईटवर 35 वर्षीय मजुराची निर्घृण हत्या करून मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवल्याची घटना उघडकीस आली आहे. खार पोलिसांनी अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून, मृताच्या 17 वर्षींय अल्पवयीन पुतण्यानेच हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला…

Read More