भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार:जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
सिन्नर तालुक्यातील ‘झाडाचे गाव’ म्हणून नावारूपाला आलेल्या भोकणी ग्रामपंचायतीला राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नाशिक आयुक्त कार्यालय, नाशिक येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच अरुण वाघ व ग्रामसेवक योगेश राहाणे यांनी पुरस्कार स्वीकारला. वृक्षलागवड व संवर्धन, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण…