Headlines

53 टक्के पाऊस झाला, तर पाणी गेलं कुठे?:आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात पावसाच्या आकडेवारीवरून शेतकऱ्यांचा संताप, मुख्यमंत्र्यांवर नाराजी




राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे सध्या दौऱ्यावर आहेत. पावसाच्या आकडेवारीवरून आणि जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावरून संतप्त शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंकडे आपल्या व्यथा मांडल्या. तसेच, मुख्यमंत्री या भागातून गेले पण त्यांनी थांबून विचारपूस केली नाही, अशी नाराजीही शेतकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. ‘५३ नव्हे, २० टक्केही पाऊस नाही’ आदित्य ठाकरे सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यावर आहे. पाहणी करताना शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आकडेवारु संताप व्यक्त केला. एका शेतकऱ्याने विचारले, “५३ टक्के पाऊस झालाय म्हणतात, मग पाणी गेलं कुठं? आम्हाला दाखवा… साहेब पाणीच पडत नाहीये, २० टक्के सुद्धा पाऊस झालेला नाही. सलग ३० दिवस पावसाने ओढ दिली आहे.” यावर आदित्य ठाकरेंनी अधिकाऱ्यांना थांबवत शेतकऱ्यांना त्यांचे म्हणणे मांडू देण्याच्या सूचना केल्या. ‘चारा नाही, जनावरे सोडून देण्याची वेळ’ पावसाअभावी पिके तर गेलीच, पण आता जनावरांच्या चाऱ्याचा आणि पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. “जनावराला चारा नाही, आता जनावरं सोडून द्यायची पाळी आमच्यावर आली आहे,” अशी भीषण वास्तवता शेतकऱ्यांनी यावेळी कथन केली. मुख्यमंत्र्यांवर नाराजी याच संवादादरम्यान शेतकऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याबाबतही नाराजी व्यक्त केली. “एवढी बिकट परिस्थिती असताना सीएम साहेब इथून गेले, पण आमच्या भागात थांबले नाहीत. त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले,” अशी खंत एका शेतकऱ्याने व्यक्त केली. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी संयमी भूमिका घेत, “मला त्यांच्यावर आता काही बोलायचे नाही, पण आम्ही तुमच्या सोबत आहोत,” असे उत्तर दिले. ‘राजकारण बाजूला ठेवून मदत करणार’ शेतकऱ्यांना धीर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आपण मोर्चे काढले, आंदोलने केली, म्हणूनच आता सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी हेच सांगायला मला पाठवले आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत. आता सगळीकडे आपण मदत केंद्रे उघडू आणि सरकारची मदत तुमच्यापर्यंत पोहोचतेय का, हे पाहण्याचे महत्त्वाचे काम आमची यंत्रणा राजकारण बाजूला ठेवून करेल.” दुष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हेही वाचा.. महाराष्ट्रातील 265 तालुक्यांत कोरडा दुष्काळ जाहीर!:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, राज्याच्या 75 टक्के भागाला तातडीने दिलासा पावसाने सलग दोन महिने मारलेली दडी आणि अल निनोच्या प्रभावामुळे करपून खाक झालेली खरीप पिके या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बळीराजासाठी अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील तब्बल 265 तालुक्यांमध्ये अधिकृतरीत्या कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये केंद्र सरकारच्या निकषानुसार ‘ट्रिगर 1’ लागू झाला असून, याचा थेट अर्थ महाराष्ट्राचा तब्बल 75 टक्के भूभाग आता दुष्काळग्रस्त म्हणून घोषित झाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *