Headlines

6.5कोटी निधी, तरी ‘डफरीन’चे फायर ऑडिट ठप्प:साबांविची स्वतंत्र चौकशी, 7दिवसांनंतर पालकमंत्री शहरात; व्हेंटिलेटरवर संशयाची सुई‎



डफरीन रुग्णालयातील ज्या भागात आग लागली, त्या परिसरातील फायर सेफ्टीसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत मागील दोन आर्थिक वर्षांत तब्बल ६ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र, तरीही फायर ऑडिट रखडल्याचा प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची सार्वजनिक बांधकाम

.

यानंतर माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, यंदा डफरीन रुग्णालयाकडून जिल्हा नियोजन समितीकडे कोणत्याही प्रकारच्या निधीची मागणी करण्यात आलेली नाही.

मागील दोन आर्थिक वर्षांत डफरीनला अनुक्रमे ३ कोटी ७६ लाख आणि २ कोटी ७३ लाख, असा एकूण ६ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. विशेष म्हणजे हा निधी डफरीनमधील ज्या भागात आग लागली, त्याच परिसरातील फायर सेफ्टीसाठी देण्यात आला होता.

या संपूर्ण प्रकरणाची राज्यस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी सुरू असून, फायर ऑडिटच्या मुद्द्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वतंत्र चौकशी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कारण या प्रकरणात स्थानिक सार्वजनिक बांधकामविभाग लपवालपवी करत असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. डफरीनच्या शूर कर्मचाऱ्यांचा लवकरच सन्मान करण्यात येणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.डफरीनच्या एसएनसीयू विभागाला सुसज्ज करण्यात येणार असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.

पालकमंत्री बावनकुळे डफरीनमध्ये पोहचले व त्यांनी पाहणी केली.

अहवाल सार्वजनिक करणार या प्रकरणातील फायर ऑडिटसह सर्व मुद्द्यांवर राज्य शासनाने नियुक्त केलेल्या समितीने चौकशी केली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणाचा दोष होता आणि कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट होईल. हा अहवाल सार्वजनिक करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

सतत मॉनिटरिंग करत होतो पालकमंत्री म्हणून नियमितपणे अमरावतीला येणारे आपण एवढ्या गंभीर घटनेनंतर सात दिवसांनंतर का आले, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बावनकुळे म्हणाले की, माझे पुर्वनियोजीत काही कार्यक्रम होते. मात्र घटनेच्या दिवशी पहाटे साडेपाच वाजताच त्यांना घटनेची माहिती मिळाली होती. त्यानंतर ते सातत्याने या प्रकरणाचे मॉनिटरिंग करत होते. जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी ते सातत्याने दूरध्वनीवरून संपर्कात होते. आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही वेळोवेळी घटनेची माहिती देत होते. या संपूर्ण प्रकरणावर आपण सातत्याने लक्ष ठेवून होतो, असा खुलासा त्यांनी केला.

हाफकिनने खरेदी केले होते रुग्णालयातील सर्व व्हेंटिलेटर ज्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे, ते व्हेंटिलेटर राज्य शासनाने नियुक्त केलेल्या हाफकिन कंपनीमार्फत खरेदी करण्यात आले होते. या कंपनीने केवळ अमरावतीतच नव्हे, तर संपूर्ण राज्यात याच प्रकारचे व्हेंटिलेटर पुरविले आहेत. सध्या १० हजार युनिट्स कार्यरत असल्याचे सांगत, चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *