Headlines

खराडीत मसाज पार्लर चालिकेला धमकावून खंडणी:देहविक्रीच्या आरोप करत मागितले पैसे, दोन महिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल




पुण्यातील खराडी परिसरात मसाज पार्लर चालवणाऱ्या एका महिलेकडून देहविक्रयाचा आरोप करत 30 हजार रुपयांची खंडणी उकळण्यात आली आहे. या प्रकरणी दोन महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी पोलीस ठाण्यात पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मसाज पार्लरमध्ये देहविक्रय सुरू असल्याचा आरोप करत महिलेला धमकावले. त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देऊन सुरुवातीला दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. एका आरोपी महिलेने तक्रारदार महिलेला मारहाणही केली. त्यानंतर तडजोडीत दीड लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पीडित महिलेने आरोपींना 30 हजार रुपये दिले. यानंतर आरोपींनी पोलिसांकडे तक्रार करणार नाही आणि कारवाई होऊ नये यासाठी मध्यस्थी करू असे आश्वासन दिले. मात्र, 14 मे रोजी आरोपींनी उर्वरित रक्कम घेण्यासाठी महिलेला कोरेगाव पार्क परिसरात बोलावले. या प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक एन. गोडसे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. शिवाजीनगर भागात हॉटेलमध्ये चोरी पुणे शहरातील शिवाजीनगर भागताील हॉटेलमधील खोलीतून एक लाख 70 हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे छत्तीसगडमधील राजनंदगाव परिसरातील राहायला आहेत. ते कामानिमित्त पुण्यात आले होते. शिवाजीनगर स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी खोली भाड्याने घेतली होती. रात्री झोपताना त्यांना उशीखाली एक लाख 70 हजार रुपयांची सोन्याची अंगठी ठेवली होती. चोरट्याने त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून उशीखाली ठेवलेली अंगठी चोरुन नेली. अंगठी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांकडून हॉटेलमधील कामगारांची चौकशी करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस शिंदे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *