- Marathi News
- National
- Monsoon To Arrive In Kerala On May 26; Super El Nino Threat Increases, Monsoon Likely To Arrive 5 Days Earlier
नवी दिल्ली / वॉशिंग्टन3 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

दक्षिण-पश्चिम मान्सून यंदा वेळेपूर्वी म्हणजेच २६ मे रोजी धडकू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. अरबी समुद्रात मान्सून पुढे सरकण्यासाठी पोषक स्थिती निर्माण होत असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये सामान्यतः मान्सून १ जून रोजी दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून २६ मे या तारखेच्या चार दिवस आधी किंवा मागे-पुढे येऊ शकतो.
हवामान विभागानुसार, येत्या २४ तासांत मान्सून बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूहाच्या दिशेने पुढे सरकेल. दुसरीकडे, अमेरिकेची हवामान संस्था ‘नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन’ (नोआ) नुसार, यंदा ‘सुपर एल निनो’ येणे जवळपास निश्चित झाले आहे. नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरच्या (सीपीसी) नवीन अपडेटनुसार, यंदा मे ते जुलै दरम्यान एल निनो सक्रिय होण्याची ८२% शक्यता आहे. हा प्रभाव हिवाळ्यापर्यंत (डिसेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७) कायम राहण्याची ९६% शक्यता आहे, तर तो ‘स्ट्रॉन्ग’ किंवा ‘वेरी स्ट्रॉन्ग’ राहण्याचा ६७% धोका आहे. यामुळे कमकुवत मान्सून, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेची भीती आहे.
संशोधनात खुलासा : जास्त पाऊस पडूनही जग सुकत चालले आहे
जगामध्ये एकूणच पावसाचे प्रमाण वाढत आहे, तरीही जमीन आणि पर्यावरण व्यवस्था अधिक सुकी होत चालली आहे. ‘नेचर’ मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधनानुसार, आता पाऊस वर्षभर सारखा पडण्याऐवजी मोठ्या आणि तीव्र वादळी स्वरूपात पडत आहे. या पावसाच्या दरम्यान कोरडे असणारे दिवस वाढले आहेत. परिणामी, एकाच वेळी खूप जास्त पाणी पडल्यामुळे माती ते शोषून घेऊ शकत नाही.
एल निनो म्हणजे काय व परिणाम
२०२७) कायम राहण्याची ९६% शक्यता आहे, तर तो ‘स्ट्रॉन्ग’ किंवा ‘वेरी स्ट्रॉन्ग’ राहण्याचा ६७% धोका आहे. यामुळे कमकुवत मान्सून, दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेची भीती आहे.
भारत आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये पाऊस कमी होतो आणि कडक उन्हाळा जाणवतो.
मध्य प्रशांत महासागरीय क्षेत्रात समुद्राचे तापमान वाढल्यामुळे मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाची स्थिती निर्माण होते. एल निनो ही एक महत्त्वाची हवामान बदलविषयक घटना आहे, जी प्रशांत महासागरातील पाणी गरम झाल्यावर घडते. यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा बदलते.