![]()
५५ हजार लोकसंख्या असलेल्या कन्नड शहरावर निगराणी ठेवण्यासाठी प्रत्येक रस्त्यावर, प्रमुख चौकात हायटेक व विविध वैशिष्ट्ये असलेले सत्तर एआय कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांवर नियंत्रण करणाऱ्या कक्षाचे उद्घाटन आज सायंकाळी सहा वा. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी दिली आहे. आमदार संजना जाधव, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री हे उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना कन्नड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सानप, अभियंता स्वप्नील बेंद्रे यांनी सांगितले की, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस बळ अपुरे पडत आहे. विद्यमान आमदार संजना जाधव यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. जिल्हा नियोजन विकास निधीतून पालकमंत्र्यांनी कन्नड शहरावर निगराणी ठेवण्यासाठी ७० हायटेक कॅमेरे उपलब्ध करून दिले. या कॅमेऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कन्नड शहर पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. यातून वैजापूर, सिल्लोड, सोयगाव, फर्दापूर या ठिकाणी महिन्याला सरासरी दिड लाख दंड वसूल होत आहे. निखिल नेटवर्क बीड या मॉनिटरिंग संस्थेमार्फत कन्नड शहरात ७० कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर सात ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत.
Source link
कन्नडमध्ये 70 हायटेक कॅमेऱ्यांची राहणार नजर:पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते होणार उद्घाटन, आमदार जाधव राहणार उपस्थित