Headlines

10 कोटीतून ‘हत्ती तलावा’ला येणार नयनरम्य पर्यटन केंद्राचे रूपडं:संगीतमय कारंजे, बोटिंग, स्वच्छता आणि नयनरम्य उद्यानामुळे अक्कलकोटच्या वैभवात पडणार भर‎


.

अक्कलकोट संस्थानाच्या काळातील हत्तीखाना व तलावाचे ऐतिहासिक महत्त्व पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अक्कलकोटमधील ऐतिहासिक हत्ती तलावाच्या मजबुतीकरण आणि सुशोभीकरणासाठी शासनाने १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, ज्यामुळे हे स्थळ आकर्षक पर्यटन केंद्र बनेल. या प्रकल्पात संगीत कारंजे, स्वच्छता आणि परिसराचा विकास या कामांचा समावेश आहे.

अक्कलकोटकरांच्या आणि स्वामीभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला ऐतिहासिक संवर्धन, पर्यटन आणि मनोरंजन या तिन्हींचा विचार करून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासनाकडून १० कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. नगरपरिषद नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी आणि प्रशासन यांच्या नियोजनातून सदर काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर शहराच्या वैभवात खूप मोठी भर पडणार असून स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर अक्कलकोट येथे काय पाहायचे, यात हत्ती तलावाच्या विहंगम दृश्याचे निरीक्षण करून आनंद घेणे सुलभ होणार आहे.

. कचरा व घाण पाण्याला बंदी: हत्ती तलावाच्या चारही बाजूंच्या भिंतींची उंची वाढवून दुरुस्ती करणे व पुन्हा कचरा करण्यास व घाण पाणी आत सोडण्यासाठी पूर्णतः बंदी करणे. . जलशुद्धीकरण: संपूर्ण शुद्ध केलेले पाणीच हत्ती तलावात सोडणे. . सौंदर्यीकरण: परिसरात सुंदर रंगरंगोटी, आकर्षक रंगसंगतीचे कारंजा निर्मिती आणि आकर्षक वृक्षारोपण केले जाणार . मनोरंजन: पर्यटकांसाठी बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *