Headlines

अद्याप तोडगाच नाही; कर्मचाऱ्यांचे आंदोलन:काळ्या फिती लावून काम, उद्यापासून देण्यात येणार धरणे‎




विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला जिल्ह्यात तीव्र स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांसह विद्यापीठाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्याने शैक्षणिक कामकाज विस्कळीत झाले आहे. दरम्यान आगामी सोमवारपासून भोजनावकाशात आपापल्या संस्थेसमोर धरणे, निदर्शने केली जाणार आहेत. शुक्रवार, १४ मेपासून हा लढा सुरु झाला. महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्यामते या आंदोलनाला राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, आंदोलनाची प्रखरता दिवसेंदिवस वाढत आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात राज्यभरातील सार्वजनिक विद्यापीठे आणि महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध केला. हे प्रतीकात्मक आंदोलन अत्यंत यशस्वी ठरत असून, सर्व कर्मचारी यामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत. कामकाजाच्या ठिकाणी काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी आपली एकजूट आणि संताप व्यक्त केला आहे. शासन दरबारी हालचालींना वेग : आंदोलनाची धग आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. राज्यभरातून मिळणारा वाढता पाठिंबा आणि कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता, शासन दरबारी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हालचाली वाढल् आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयातील सूत्रानुसार प्रलंबित मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तातडीने बैठकांचे सत्र सुरू झाले असून, सरकारवर दबाव वाढला आहे. ‘नुटा’च्या पाठिंब्यामुळे संघटनेचे बळ वाढले या लढ्याला आता शैक्षणिक वर्तुळातूनही मोठे बळ मिळाले आहे. नागपूर युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशनचे (नुटा) अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी या राज्यव्यापी आंदोलनाला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. डॉ. रघुवंशी यांनी संयुक्त कृती समितीच्या अध्यक्षांना पाठिंब्याचे अधिकृत लेखी पत्र सुपुर्द केले. शिक्षक संघटनेच्या या पाठिंब्यामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *