Headlines

बेगमपुऱ्याच्या इतिहासाची हेरिटेज वॉकमध्ये उलगडली पाने:थत्ते हौद ते कुंभारगल्ली : बेगमपुरा हेरिटेज वॉकमध्ये 250 हून अधिक नागरिकांची ऐतिहासिक सफर




ऐतिहासिक वारसा जपणे आणि नागरिकांमध्ये शहराच्या संस्कृतीबद्दल जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने रविवारी (१७ मे) सकाळी ‘बेगमपुरा हेरिटेज वॉक’चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आणि ‘इन्टॅक’ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या शहराच्या वेशीबाहेर वसलेल्या बेगमपुरा भागातील जिवंत इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी तब्बल २५० हून अधिक सजग नागरिक या सफरीमध्ये सहभागी झाले. छत्रपती संभाजीनगर हे ५२ दरवाजांचे आणि समृद्ध ऐतिहासिक वारसा असलेले शहर म्हणून ओळखले जाते. यापूर्वी शहरात झालेल्या विविध विकासकामांच्या आणि रस्ता रुंदीकरण मोहिमेच्या वेळीही शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि संस्कृतीचे जतन करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. या उपक्रमात शहराचे महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे, उपायुक्त अंकुश पांढरे आणि इन्टॅकच्या निमंत्रक माया वैद्य यांच्यासह स्थानिक इतिहासकार, विद्यार्थी आणि वारसाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ऐतिहासिक पाऊलखुणांचा रंजक मागोवा सकाळी ठीक ७ वाजता थत्ते हौद येथून सुरू झालेली ही सफर बेगमपुऱ्यातील विविध ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा घेत पुढे गेली. थत्ते हौद : तत्कालीन प्रगत जलव्यवस्थापन आणि स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना. थत्ते नहर आणि थत्ते परिवाराच्या योगदानाची माहिती देण्यात आली. जुने वाडे आणि मंदिरे : पारंपरिक निवासी स्थापत्यशैली आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणाऱ्या वास्तू. मुघलकालीन दिवाणखाना: ऐतिहासिक पटेल वाड्यात मुघल काळातील भव्य राहणीमान,आणि वास्तुकलेची पाहायला मिळालेली झलक. हनुमान व्यायामशाळा : शहराच्या क्रीडा आणि मल्लविद्येच्या परंपरेची साक्ष देणारा पारंपरिक कुस्तीचा आखाडा इतिहासप्रेमींनी पाहिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *