Headlines

आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आमठणा-खातखेडा रस्त्याचे भूमिपूजन:प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर




बोरगाव बाजार | आमठणा-बोरगाव-खातखेडा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला असून, या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दीर्घकाळापासून या रस्त्याची अवस्था खराब झाल्याने ग्रामस्थ, शेतकरी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. भूमिपूजन कार्यक्रमाला सरपंच सय्यद सत्तार, केशवराव तायडे, अर्जून गाढे, भाऊराव साळवे, उपसरपंच लक्ष्मण साखरे, कौतिक चव्हाण, शाम अधिकार, दिलीप चव्हाण, अंबादास शिंदे, सुनिल सोनवणे, सय्यद अजीज, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी ग्रामीण भागातील रस्ते विकासाला शासन प्राधान्य देत असल्याचे सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *