Headlines

ग्राम सुरक्षा दल अन् पोलिस मित्रांनी शांतता-सुरक्षिततेसाठी सक्रिय राहण्याची आवश्यकता:बार्शीत पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पोलीस मित्र व नागरिकांना दिल्या सूचना‎



ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र यांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. गावातील शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी सक्रिय सहभाग घेत पोलिस व नागरिक यांच्यात समन्वय वाढवून गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात

.

यावेळी पोलिस ठाणे हद्दीतील पोलिस पाटील, ग्राम सुरक्षा दल व पोलिस मित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी उत्सव, सण, बकरी ईद तसेच ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, सामाजिक सलोखा कायम राहावा, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश सोशल मीडियावर प्रसारित होऊ नयेत याबाबत विशेष ताकीद देण्यात आली. कांही लोकांच्या संशयित हालचाली, भांडणतंटे, अवैध धंदे तसेच जातीय-धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून तत्काळ पोलिस ठाण्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, सहाय्यक फौजदार गवळी, पोलीस हवालदार दशरथ बोबडे, राजेंद्र मंगरुळे, रुपेश शेलार, धनराज केकाण, पोलिस कॉन्स्टेबल राहुल बोंदर, फॉरेन्सिक टीमचे सदस्य यांच्याबरोबर गावातील नागरिकही या कार्यक्रमाला मोठ्या संख्योने उ पस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *