![]()
प्रतिनिधी | अमरावती जपानच्या ऐची-नागोया शहरात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय रिकर्व धनुर्विद्या संघात अमरावतीचे आंतरराष्ट्रीय धनुर्धर यशदीप भोगे व कुमकुम मोहोड या दोघांचा समावेश झाल्यामुळे शहराच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. यशदीप पुरुष तर कुमकुम महिला संघाची सदस्य आहे. कुमकुमने नुकत्याच चीनमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वाचे, उर्वरित,पान४ पदक घेऊनच येणार ^एकाचवेळी भारतीय धनुर्विद्या संघात यशदीप व कुमकुम या दोन्ही अमरावतीच्या धनुर्धरांना स्थान मिळाले ही अभिमानास्पद बाब आहे. शहरात पदक घेऊनच परत येतील असा विश्वास आहे. – प्रमोद चांदूरकर, सचिव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना.
Source link
धनुर्धर यशदीप भोगे, कुमकुम मोहोड भारतीय धनुर्विद्या संघात झाले दाखल:जपान येथील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड, सर्वत्र कौतुक