Headlines

मानोरीमध्ये गुरूवारपासून भक्तिमय श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा:अधिक मासानिमित्त आयोजन; 8 दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयाेजन‎



सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र मानोरी येथे अधिक मासानिमित्त उद्या गुरुवार (दि. २१) ते २८ मे दरम्यान श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आठ दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक उपक्रमांची रेलचेल उपस्थित भाविकांना पाहायला

.

या पार्श्वभूमीवर येथील म्हसोबा महाराज पटांगणात महंत अमृतनाथ महाराज यांच्या हस्ते तसेच भागवताचार्य गोरक्षनाथ महाराज देठे (आडगाव, ता. राहता) यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. संतोष कुलकर्णी गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात हा कार्यक्रम झाला.

ग्रामस्थ व युवकांनी कार्यक्रमाची जय्यत तयारी केली असून, पटांगणात भव्य धर्मव्यासपीठ व मंडप उभारण्यात आला आहे. मंदिर परिसरातील कलशांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, परिसरात स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. गुरुवारपासून सुरू होणाऱ्या भागवत कथेदरम्यान दररोज सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत भागवताचार्य गोरक्षनाथ महाराज देठे यांचे कथानिरूपण होईल. कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना दररोज अन्नदात्यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. गुरुवारी (दि. २८) रोजी सकाळी ९ वाजता टाळ-मृदंगाच्या जयघोषात ग्रामप्रदक्षिणा काढण्यात येणार असून, त्यानंतर काल्याच्या कीर्तनाने नामकथेची सांगता होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमास मानोरी गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *