सातारा जिल्ह्यातील वाई शहरात कृष्णा नदीच्या काठावर असलेल्या गणपती घाटावर ‘लघु कुंभमेळा-२०२६’चे आयोजन करण्यात आले असून, २१ ते २५ मे दरम्यान महागणपती घाट येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. वाई नगरपरिषद आणि लघु कुंभसेवा समिती, शक्ती शिवगंगा अट
.
या कुंभमेळ्यात देशभरातील सुमारे ३५० साधू-संत, नागा संन्यासी, महामंडलेश्वर आणि विविध आखाड्यांचे संत सहभागी होणार आहेत. हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यांप्रमाणेच वाईचे धार्मिक महत्त्व जगासमोर यावे, हा या आयोजनामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सोहळ्या दरम्यान २१ मे रोजी भूमिपूजन व छावणी प्रवेश, २२ मे रोजी धर्मध्वजा आरोहण, २३ मे रोजी विष्णूयाग व सार्वजनिक हवन, २४ मे रोजी हिंदू महासभा व दीप प्रज्वलन, तर २५ मे रोजी नागा संन्यासींचे पावन स्नान, रथ शोभायात्रा आणि महिला कलश शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या कुंभमेळ्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज यांच्यासह विविध पीठाधीश्वर उपस्थित राहणार आहेत. तसेच मंत्री, खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.
असले कृत्य सामाजिक स्वास्थ बिघडवणारे
दरम्यान, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष महेंद्र सिंह राजपूत यांनी वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांना एक पत्र लिहून निषेध व्यक्त करतानाच आपले कृत्य संविधानाच्या वरचा आघात आहे, तसेच वाईचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारा आहे. धर्म सुधारक व समाज प्रबोधक केवलानंद सरस्वती, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे तसेच रा.ना चव्हाण यांच्या प्रबोधनावर आघात करणारा आहे, असे महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राजपूत यांनी म्हटले आहे.

सप्त गंगा मंत्रामध्ये कृष्णा नदीचा उल्लेख का नाही?
दरम्यान विद्रोही सांस्कृतिक चळवळ, महाराष्ट्र यांच्यावतीने अध्यक्ष कॉम्रेड धनाजी गुरव, सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे व प्रवक्ते कॉम्रेड अविनाश कदम यांनीही निषेधाचे पत्रक काढून कृष्णा नदीला जर तुम्ही पवित्र मानता तर सप्त गंगा मंत्रामध्ये/ श्लोकामध्ये कृष्णा नदीचा उल्लेख का केला गेला नाही याचा खुलासा संयोजक करतील का? ‘गंगा, सिंधू, सरस्वतीच यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेंद्र, तनया, वेदिका’ या मंत्रामध्ये कृष्णा नदीचे नाव नाही आणि आता कृष्णा नदीचे महत्व हे आयोजक सांगू लागले आहेत, याला पुतना मावशीचे प्रेम म्हणावे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून काय साधले जाणार?
शिवाय कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून काय साधले जाणार आहे? जागतिक बंदीच्या कालावधीत असा खर्च करणे नगरपालिकेसारख्या यंत्रणेला शोभते का? असा सवाल विद्रोही सांस्कृतिक चळवळीने उपस्थित केला आहे.

पोलिसांनी नाकारली आंदोलनाची परवानगी
दरम्यान वाई येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी वाई शहर पोलिसांकडे आम्ही संविधानिक मार्गाने चरख्यावर सूत कातून आंदोलन करणार असल्याचे वाई पोलीस स्टेशनसमोर असे लिखित स्वरूपात पत्र दिले असता, वाईच्या पोलीस निरीक्षकांनी आपल्याला असे करता येणार नाही, म्हणून त्याला परवानगी नाकारल्याचे विशाल सपकाळ यांनी सांगितले.