Headlines

रब्बीच्या ई पीक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम जिल्ह्यात अव्वल:42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टर क्षेत्रावरील पाहणी पूर्ण, तहसीलदार शारदा दळवीचे नियोजन




हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या ई पिक पाहणीमध्ये वसमत तालुक्याचे काम अव्वल ठरले असून 42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टरवरील ई पिक पाहणीचे काम पूर्ण झाले आहे. तर सर्वात कमी 46 टक्के काम कळमनुरी तालुक्याचे झाले आहे. वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांच्या नियोजनामुळे मुदतीमध्ये सर्वात जास्त काम झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात रब्बी हंगामाचे सर्व साधारण क्षेत्र सुमारे 1.50 हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे. शासनाकडून नुकसान भरपाईसाठी ई पिक पाहणी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमधून जास्तीत जास्त क्षेत्रावरील ई पिक पाहणी करून पिकांचे छायाचित्र ॲपवर अपलोड करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पाचही तालुक्यांनी नियोजन करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यांनी तातडीने रब्बी हंगामासाठी ई पिक पाहणीचे काम हाती घेण्यात आले होते. ता. 31 मार्च हि अखेरची मुदत असल्याने या मुदतीत कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरु होती. त्यासाठी प्रत्येक गावांमधून बैठका घेऊन शेतकऱ्यांना ई पिक पाहणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, वसमत तालुक्यात उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शारदा दळवी यांनी पोलिस पाटील, कोतवाल व रोजगार सेवकांची बैठक घेऊन ई पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या ठिकाणी वेळोवेळी आढावा घेऊन येणाऱ्या अडचणींची सोडवणुक देखील केली होती. त्यामुळेच वसमत तालुक्याचे ई पिका पाहणीचे काम 75 टक्के झाले आहे. तालुक्यातील 42 हजार हेक्टरपैकी 31 हजार हेक्टरवरील पिकांची ई पिक पाहणी झाली आहे. या शिवाय औंढा नागनाथ तालुक्याचे 64 टक्के काम झाले असून 25 हजार पैकी 16 हजार हेक्टरवर पिक पाहणी झाली. कळमनुरी तालुक्यात 46 टक्के काम झाले असून 50हजार पैकी 23 हजार हेक्टरवर पाहणी झाली. सेनगाव तालुक्यात 49 टक्के काम झाले असून 27 हजार हेक्टरपैकी 13 हजार हेक्टरवर पाहणी झाली. तर हिंगोली तालुक्यात 63 टक्के काम झाले असून 31 हजार पैकी 19 हजार हेक्टरवर पिक पाहणी झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *