- Marathi News
- National
- In Punjab Too, There Was A Case Of Army Spying Through CCTV, Live Feed Was Being Sent Abroad
पठाणकोट4 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील नोएडानंतर आता पंजाबमध्येही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लष्कराची हेरगिरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पठाणकोटमध्ये पोलिसांनी या प्रकरणात एका तरुणाला अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने राष्ट्रीय महामार्ग-४४वरील पुलाजवळील दुकानात इंटरनेटसह सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याचे उघड झाले.
या कॅमेऱ्याचा उद्देश लष्कर आणि निमलष्करी दलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे हा होता. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी कॅमेऱ्याची थेट दृश्यफीत पाकिस्तानमधील हँडलर्सना पाठवत होता. चौकशीत आरोपीने जानेवारीमध्ये हा कॅमेरा बसवल्याचे सांगितले. तसेच त्याला दुबईत बसलेल्या एका व्यक्तीकडूनही सूचना मिळत होत्या.पोलिसांनुसार चक्क धारीवाल गावातील बलजीत सिंह याला यासाठी ४० हजार रुपये देण्यात आले होते. गेल्या महिन्यातही पोलिसांनी पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित दोन हेरगिरी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. त्यात चीनमध्ये बनवलेल्या सोलर पॉवर्ड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संवेदनशील लष्करी ठिकाणांची थेट दृश्यफीत पाकिस्तानला पाठवली जात होती.
दिल्ली पोलिसांनी एप्रिलमध्ये राजस्थानातील संवेदनशील वाळवंटी भाग आणि लष्करी छावण्यांजवळ रस्त्यांवर गु कॅमेऱ्यांच्या मोठ्या जाळ्याचा भांडाफोड केला होता. काश्मीरमध्येही या घटना समोर आल्या.
आता राजस्थानमध्ये ड्रोनद्वारे वाढली मादक पदार्थ तस्करी
पंजाबनंतर आता राजस्थानमध्येही ड्रोनच्या माध्यमातून सीमापार अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे. पाकिस्तानी हँडलर्स रात्रीच्या अंधारात हेरॉइन आणि इतर अमली पदार्थ भारतीय हद्दीत टाकत आहेत. पूर्वी राजस्थानातील सीमावर्ती मार्गांचा वापर केवळ ‘ट्रान्झिट रूट’ म्हणून केला जातो. राजस्थानला थे डिलिव्हरी केंद्र बनवल्याचे समोर आले.