![]()
पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतीसमोर उभ्या राहिलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरात एक वेगळीच आर्थिक चळवळ पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनहून दरवर्षीप्रमाणे यंदाही व्यापाऱ्यांनी विविध जातींच्या कोंबड्या व बदकांसह हजेरी लावली असून, या प
.
शेतीपूरक व्यवसाय म्हणून पारंपरिक दुग्ध व्यवसायाबरोबरच आता कुक्कुटपालन आणि विशेषतः बदक पालनाकडे शेतकरी झुकताना दिसत आहेत. जुन्नर तालुक्यात चिनी कोंबडी, राजहंस डक आणि व्हाईट डक यांची मागणी वाढली असून अनेक शेतकरी या व्यवसायाकडे उत्पन्नाचे पर्यायी साधन म्हणून पाहत आहेत. या पक्ष्यांची एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जलद वाढ आणि तुलनेने चांगली रोगप्रतिकारक क्षमता. त्यामुळे कमी वेळात उत्पन्न देणारा हा व्यवसाय म्हणून त्यांना पसंती मिळत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता अशा नव्या संधींचा शोध घेत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
दरांच्या बाबतीतही या बाजारात चांगली उलाढाल होत आहे. बदकाची जोडी सुमारे १३०० रुपये, व्हाईट डक ४००० रुपये, राजहंस ७००० रुपये, तर चिनी कोंबडीची जोडी सुमारे १२०० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. विशेष म्हणजे या जाती पुणे जिल्ह्यात सहज उपलब्ध नसल्याने स्थानिक शेतकऱ्यांसाठी हा थेट खरेदीचा मोठा पर्याय ठरत आहे.
दरवर्षी उज्जैनहून येणाऱ्या या व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना दूरवर भटकंती न करता दर्जेदार पक्षी मिळत आहेत. त्यामुळे अनेकांनी आपल्या शेतात छोट्या प्रमाणात का होईना,पण पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर आळेफाटा परिसरात हा छोटा पण परिणामकारक व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.