Headlines

अमृतसरमध्ये कपिल शर्माच्या घराबाहेर गोळीबार:हॉली सिटी येथील निवासस्थानी घडली घटना, कोणीही जखमी नाही, पोलीस तपास करत आहेत




प्रसिद्ध कॉमेडियन आणि टीव्ही स्टार कपिल शर्माच्या अमृतसर येथील निवासस्थानाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकल किंवा कारमधून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अमृतसरमधील पॉश परिसर हॉली सिटी येथील कपिल शर्माच्या घराबाहेर धडाधड दोन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले आणि संपूर्ण परिसर सील केला. सुदैवाने, या घटनेत कोणीही जखमी झाल्याची किंवा कोणतीही जीवितहानी/वित्तहानी झाल्याची माहिती नाही. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत घटनेनंतर पोलिसांनी कपिल शर्माच्या घराबाहेर आणि आसपासच्या व्हीआयपी निवासस्थानांबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले आहे, जेणेकरून हल्लेखोरांचा मार्ग आणि त्यांची ओळख पटवता येईल. पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गोळीबाराचे कारण आणि हल्लेखोरांचा हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. कॅनडामध्ये असलेल्या ‘कॅप्स कॅफे’वरही गोळीबार झाला आहे कपिल शर्मा किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही मालमत्तेला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी कॅनडातील सरे (Surrey) शहरात असलेल्या त्यांच्या प्रसिद्ध ‘कॅप्स कॅफे’बाहेरही अनेकदा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅनडामध्ये झालेल्या त्या घटनांची जबाबदारी काही खलिस्तानी समर्थक घटकांनी घेतली होती. आता घरावर झालेल्या गोळीबारात पोलीस या घटनेचे धागेदोरे जुन्या प्रकरणांशी किंवा कोणत्याही आंतरराष्ट्रीय खंडणी/धमकीशी जोडलेले आहेत का, याचाही तपास करत आहेत. घटनेनंतर हॉली सिटी परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *