Headlines

मंदिर समितीचा निर्णय:अधिक मास अन् सुटीमुळे गर्दी; श्री विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, दर्शनरांगेमध्ये घुसखोरी केल्यास कारवाई




अधिक मासानिमित्त चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता दर्शन रांग व मंदिर परिसरात शेडनेट उभारून सावलीची सोय करण्यात आली आहे, तसेच दर्शन रांगही वॉटरप्रूफ (जलरोधक) करण्यात आली आहे. तसेच अधिक मासाच्या काळात व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत. दि. १७ मे ते १५ जून या कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी रांगांमध्ये मोठी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी (पंढरपूर विभाग) यांनी शासन निर्णय व मार्गदर्शक सूचनांनुसार दर्शन रांगांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पोलिस आणि मंदिर प्रशासनास दिले आहेत. कोणत्याही भाविकाला अन्य मार्गाने किंवा नियमबाह्य पद्धतीने दर्शन देऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. घुसखोरी करून गोंधळ निर्माण केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दर्शनरांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तसेच, व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भाविकांना ताटकळत राहावे लागत असल्याने हे दर्शनही बंद करण्यात आले आहे. दर्शनरांगेत घुसखोरी करणारे, नियमांचे उल्लंघन करणारे अथवा भाविकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *