Headlines

गंगापूरला शेकडो तक्रारींचा निपटारा; प्रमाणपत्रांचे वाटप:नागरिकांनी मांडल्या पाणी, वीज, रस्ते, महसूलच्या तक्रारी‎




गंगापूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली शेकडो तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्यात आला. या जनता दरबारात नागरिकांनी पाणी, वीज, रस्ते, महसूल, शासकीय योजनांचा लाभ याबाबत विविध तक्रारी नागरिकांनी मांडल्या. आमदार बंब यांनी प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाहीचे आदेश देत अनेक प्रकरणे जागेवरच निकाली काढली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन काहींना आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे एका दिवसात उपलब्ध करून देण्यात आली. तसेच रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी आमदारांनी स्वतःच्या निधीतून मदत जाहीर केली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी अधिकाऱ्यांना कामात दिरंगाई करू नये, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आमदार बंब यांनी दिला. गंगापूर शहरात आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत जनता दरबार झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *