![]()
पृथ्वीच्या पोटात दडलेल्या “रेअर अर्थ मिनरल्स’वर (दुर्मिळ खनिजे) एकाधिकारशाही गाजवणाऱ्या चीनला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी “क्वाड’ देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीव्यतिरिक्त भारत आणि अमेरिकेने एका मोठ्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि त्यांचे अमेरिकी समकक्ष मार्को रुबियो यांनी सांगितले की, हे योग्य वेळी उचललेले अत्यंत आवश्यक पाऊल आहे. जयशंकर यांच्या मते, या फ्रेमवर्कमध्ये दुर्मिळ खनिजांचे उत्खनन, प्रक्रिया, पुनर्वापर आणि यासंबंधित गुंतवणुकीचा समावेश आहे. रुबियो यांनी सांगितले की, हा करार दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारीचे”ठोस उदाहरण’ आहे. क्रिटिकल मिनरल सप्लाय चेन सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका खाजगी क्षेत्रासोबत मिळून ३० अब्ज डॉलर्सहून अधिक निधी उभारणार आहे. दुसरीकडे, “क्वाड’ देशांनी (भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान) या खनिजांवर सहकार्याचा नवा आराखडा जाहीर केला आहे. याअंतर्गत पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी सरकारी आणि खाजगी भागीदारीतून २० अब्ज डॉलर्सपर्यंतची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिली. भारताकडे ६९ लाख टन रेअर अर्थ साठा क्रिटिकल मिनरल्सचा वापर ईव्ही , ड्रोन ,बॅटरी स्टोरेज यांसारख्या हाय-एंड टेक उत्पादनांमध्ये होतो. चीन या क्षेत्रात दीर्घकाळापासून मोठा खेळाडू राहिला आहे. जागतिक रेअर अर्थ मायनिंगमध्ये चीनचा वाटा सुमारे ७०% आहे.जगातील एकूण रेअर अर्थ खनिजांच्या साठ्यापैकी भारताकडे सुमारे ७% वाटा आहे. येथे ६९ लाख टन रेअर अर्थ ऑक्साईडचा साठा आहे. यात सिरियम, लॅन्थेनम, निओडीमियम आणि प्रॅसिओडीमियम यांसारख्या रेअर अर्थ खनिजांचा समावेश आहे. ओडिशातील छत्रपूर, केरळमधील चवारा, अलुवा, तमिळनाडूतील मानावलकुरुची तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम व भीमुनिपट्टणम येथे याचे साठे आहेत. तर, ‘हेवी रेअर अर्थ मटेरियल्स’चे साठे राजस्थानमध्ये बाडमेरचे कमाइथाई, जालोर आणि उदयपूर येथे आहेत.गुजरातमधील छोटा उदयपूर येथे कार्बोनेटाइट खडकांचा मोठा साठा आहे, जो रेअर अर्थचा एक प्रमुख संभाव्य स्रोत आहे.भारतात बहुतांश ‘मोनाझाइट’ वाळूच्या रूपात आहे.
Source link
मोठा करार:भारत-अमेरिका पृथ्वीतून काढणार दुर्मिळ खनिजे, ‘क्वाड’ बैठकीत आराखडा सादर