![]()
सांगोला तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आज मुंबई येथे कृषीमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेत तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून प्रभावित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यावर कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे सकारात्मक आश्वासन दिले आहे. मंत्रालय येथे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांची भेट घेत तालुक्यातील खरी परिस्थिती समोर मांडली. सांगोला तालुक्यातील चोपडी, नाझरे, बलवडी, सोमेवाडी, हातीद, उदनवाडी, गौडवाडी आदी गावांमध्ये आणि आसपासच्या परिसरातील डाळिंब, द्राक्ष, पेरू, भाजीपाला व इतर पिकांवर गारपिटी आणि अवकाळी पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. या गारपिटीमुळे फळबागांच्या संरक्षक जाळ्या खराब झाल्या असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळली आहेत आणि उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले असून या नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यांसह अवकाळीमुळे अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी कृषीमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. ^सांगोला तालुक्यातील चोपडी, नाझरे, बलवडी, सोमेवाडी, हातीद, उदनवाडी, गौडवाडी आदी गावांतील डाळिंब, द्राक्ष, पेरू आणि भाजीपाल्याचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. संबंधित महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत मंजूर करण्यात यावी. डॉ. बाबासाहेब देशमुख, आमदार त्वरित नुकसान भरपाई व मदत मंजूर करण्यात यावी
Source link
सांगोल्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या:आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मंत्रालयात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घेतली भेट