Headlines

शिवराज मोटेगावकरने स्पेशल बॅचच्या 150 विद्यार्थ्यांना गेस पेपर दिला:ठराविक विद्यार्थ्यांना 580 पेक्षा अधिक गुण दाखवल्याची माहितीही उघडकीस



नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरसीसी क्लासेसमध्ये सराव परीक्षेत ठराविक विद्यार्थ्यांना ५८० पेक्षा जास्त गुण दाखवले जायचे. त्यानंतर या विद्यार्थ्यांची एक वेगळी ‘स्पेशल बॅच’ बनवण्यात आली. या ‘एम्स टॉपर’ नावा

.

सीबीआयचे तपास पथक सध्या लातुरात ठाण मांडून आहे. आतापर्यंत ज्यांची चौकशी झाली, ते सर्व विद्यार्थी मोटेगावकरच्या आरसीसी क्लासेसशी जोडलेले असल्याचे उघड झाले आहे. या स्पेशल बॅचमधील मुलांना नीट परीक्षेतील संभाव्य प्रश्न उपलब्ध करून दिले होते का, याचा शोध सुरू आहे. सीबीआयच्या पथकाने लातूरसह अंबाजोगाई, बीड, नांदेड, परभणी जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देत चौकशीची प्रक्रिया पूर्ण केली.

पीएमओचा हस्तक्षेप

नीट-यूजी पेपर लीक प्रकरणामुळे २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेची संपूर्ण जबाबदारी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) सांभाळणार आहे. पेपर सेट करण्यापासून ते परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी लष्कराची मदत घेतली जाऊ शकते. गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.

रफ नोट्स व गेस पेपर ठरणार मुख्य पुरावे

संचालक मोटेगावकर याला अटक केल्यानंतर तपासाला वेग आला आहे. सीबीआय अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे ‘मोटेगावकर यांनी किती पैसे घेतले?’, ‘परीक्षेच्या आदल्या दिवशी नेमके कोणते प्रश्न दिले?’ अशी विचारणा केली. केवळ विचारपूस न करता, क्लासेसमध्ये देण्यात आलेले गेस पेपर, सराव परीक्षेच्या काही निवडक प्रश्नपत्रिका आणि मुलांनी आपल्या वहीत लिहून काढलेले संभाव्य प्रश्न सीबीआयने जप्त केले. हेच रफ नोट्स,पेपर आता या आर्थिक गैरव्यवहाराचे व पेपरफुटीचे मुख्य पुरावे ठरतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *