- Marathi News
- National
- Monsoon Delayed… Stuck 35 Km Away In Kerala Till June 3 4, Meteorological Department Had Said Monsoon Will Hit Kerala On May 26
अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

केरळममध्ये मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान विभागाचा अंदाज चुकीचा ठरला. मान्सून केरळमच्या किनाऱ्यापासून ३०-३५ किमी अंतरावर ५ दिवसांपासून अडकला असून पुढील २-३ दिवसांत तो पुढे जाण्याची शक्यता नाही. हवामान विभागाने १५ मे रोजी म्हटले होते की, केरळममध्ये २६ मे रोजी मान्सून धडकेल.
या अंदाजात ४ दिवस मागे-पुढे होण्याची शक्यताही वर्तवली होती. खासगी हवामान संस्था स्कायमेटचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांचा अंदाज आहे की, मान्सून किमान ३ ते ४ जूनला येऊ शकतो. तरीही मुसळधार पावसासह मान्सून धडकण्याची चिन्हे नाहीत. पुढेही देशाच्या इतर भागांत त्याची गती अत्यंत संथ राहील. मान्सूनने १६ मे रोजी अंदमान-निकोबारसोबतच श्रीलंकेच्या दक्षिण भागातही धडक दिली होती. १२ दिवसांनंतरही परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे मान्सून रेंगाळला आहे.
महाराष्ट्रात गुरुवारी सर्वाधिक ४६.८ तापमान वर्धा येथे नोंदवले गेले. नागपूर ४६.४, गोंदिया ४६.१, चंद्रपूर ४५.४, अमरावती ४५.२, जळगाव ४२.४, परभणी ४२.४, बीड ४१.८, संभाजीनगर ४१.४, सोलापूर ४१.२, अहिल्यानगर ४१.०, धाराशिव ३९.१, पुणे ३८.४, नाशिक ३७.० अंशावर राहिले. तर अमरावतीत पाऊस बरसला.
100 वर्षांतील 17 एल निनो वर्षाचे समीकरण
वर्ष (एल निनो) मान्सून पाऊस 1951 (मध्यम) 31 मे 81.3 टक्के 1953 (कमकुवत) 7 जून 110 टक्के 1957 (मजबूत) 1 जून 97.6 टक्के 1965 (मजबूत) 26 मे 81.8 टक्के 1969 (कमकुवत) 17 मे 100 टक्के 1972 (मजबूत) 18 जून 76.1 टक्के 1987 (मजबूत) 2 जून 80.6 टक्के 1997 (मजबूत) 9 जून 102 टक्के 2004 (कमकुवत) 4 जून 86.2 टक्के 2009 (कमकुवत) 23 मे 78.2 टक्के 2015 (मजबूत) 5 जून 86.2 टक्के 2018 (कमकुवत) 29 मे 90.6 टक्के 2023 (मजबूत) 8 जून 94.4 टक्के
एल निनो फेजकडे वाटचाल ः ६ महिन्यांत समुद्राचे तापमान जितके वाढले… ते शंभर वर्षांत सर्वाधिक
२६ जानेवारीपासून आतापर्यंत मध्य प्रशांत महासागराचे सरासरी तापमान १° अंश सेल्सियसपेक्षा जास्त वाढले. हा या शतकातील सर्वात वेगवान वॉर्मिंग ट्रेंड आहे. यातून संकेत मिळतात की, प्रशांत महासागर वेगाने एल निनो फेजकडे वाटचाल करत आहे. महासागराच्या ४ भागांपैकी सर्वात महत्त्वाचा निनो ३.४ इंडेक्स मे २०२४ नंतर प्रथमच +०.५ अंशापर्यंत पोहोचला. याच मर्यादेनंतर एन्सो न्यूट्रलवरून एल निनो स्थिती मानली जाऊ लागते…
१९५० पासून आतापर्यंत केवळ ६ वेळा सुपर एल निनो तयार झाले आहेत. यापैकी २ वेळा मान्सून सामान्य राहिला, एकदा सामान्यपेक्षा कमी, दोनदा सामान्य दुष्काळ आणि एकदा भयंकर दुष्काळ पडला. १९७२ मध्ये सर्वात मजबूत सुपर अल निनो तयार झाला होता, त्या वर्षी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २.३ अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते आणि त्या वर्षी मान्सूनच्या काळात केवळ ७६% पाऊस झाला होता. यानंतर १९८२ मध्ये मॉडरेट अल निनो असूनही त्या वर्षीदेखील ८५% पाऊस झाला होता. हवामान तज्ज्ञ जी. पी. शर्मा म्हणतात की, मान्सून निर्धारित वेळेआधी किंवा नंतर येणे किंवा एल निनो कमकुवत किंवा मजबूत असण्याचा मान्सूनच्या पावसाशी थेट संबंध नाही.