Headlines

डीएमआयसीतील रासायनिक सांडपाणी नाल्यात:विहिरींच्या पाण्याचा रंग हिरवा, दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर, शेतीची सुपीकता घटत आहे‎


.

करमाड डीएमआयसी परिसराचा वेगाने विस्तार सुरू आहे. दुसरीकडे वाढते प्रदूषण, दूषित पाणी, रासायनिक कचरा यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. औद्योगिक सांडपाणी थेट नाल्यांत सोडले जात असल्याचा आरोप आहे. परिसरातील विहिरी, बोअरवेल, भूजल स्रोत धोक्यात आले आहेत. अनेक ठिकाणी हिरवट रंगाचे पाणी दिसत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही उद्योगांतून रासायनिक पाणी उघडपणे नाल्यांत सोडले जाते. हे पाणी नाल्यांमार्फत शेतीत मिसळते. ते विहिरींतही जाते. काही विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात फेस साचला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित विभागांनी तातडीने पाण्याचे नमुने तपासावेत, अशी मागणी होत आहे. करमाडचे माजी सरपंच दत्ताभाऊ उकर्डे यांनी सांगितले, करमाड एमआयडीसीचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रसायनमिश्रित दूषित पाणी गावाच्या पूर्वेकडील ओढ्यात सोडले जात आहे. दूषित पाण्यामुळे परिसरातील विहिरी फेसाळल्या आहेत. जमिनीचा पोत खराब झाला आहे. हे पाणी जनावरेही पीत नाहीत. दूषित पाण्यामुळे आजार वाढण्याची भीती दूषित पाण्यामुळे शेतीची सुपीकता घटत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अनेक नागरिकांनी विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा आरोप केला आहे. पाण्याला विचित्र रंग येतो. दुर्गंधी येते. त्वचारोग, पोटाचे विकार, इतर गंभीर आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल Ãकर्मचाऱ्यांमार्फत डीएमआयडीसी परिसरात पाहणी होईल. नाल्यातील तसेच विहिरीतील दूषित पाण्याचे नमुने घेतले जातील. प्रयोगशाळेतील अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई होईल. -अवचट नंदवटे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी दूषित रासायनिक पाण्यामुळे विहिरीतील पाणी हिरवट व फेसाळ झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *