![]()
निफाड-चांदवड मार्गावरील शिवडी येथील मध्य रेल्वे मार्गावर उड्डाणपूल उभारणीच्या कामासाठी रेल्वे गेट बंद करण्यात आले आहे. या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी म्हणून तयार करण्यात आलेला सुमारे दीड किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीट रस्ता अवघ्या तीन महिन्यांतच
.
शिवडी येथे उड्डाणपूलाचे काम सुरू होणार असल्याने १ एप्रिलपासून रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले. त्यामुळे रेल्वे गेटच्या पूर्वेकडील पुलाखालून ये-जा करण्यासाठी सुमारे दीड किलोमीटर लांबीचा सिमेंट काँक्रीटचा पर्यायी रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्याचे बांधकाम मार्च महिन्यात पूर्ण झाले असून एप्रिलपासून वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला आहे.
या मार्गावरून स्थानिक वाहने, कार, जीप आणि ट्रॅक्टरची वाहतूक होत असतानाही अवघ्या दोन ते अडीच महिन्यांत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यातील लोखंडी गज उघडे पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर असताना रस्त्याची दुरवस्था अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवडीच्या सरपंच संगिता सांगळे, माजी सरपंच प्रमोद क्षीरसागर, उगावचे माजी चेअरमन मधुकर ढोमसे, माजी उपसरपंच प्रभाकर मापारी, अरुण क्षिरसागर, अब्दुल शेख यांच्यासह नागरिकांनी केली आहे.