Headlines

कळवण रुग्णालयातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती नियुक्त:औषध तुटवडा, रुग्णांची हेळसांड व रेफरच्या वाढत्या तक्रारींमुळे समिती स्थापन‎



कळवण उपजिल्हा रुग्णालयातील वाढत्या तक्रारींची दखल घेत आरोग्यमंत्र्यांच्या आदेशान्वये नोडल अधिकारी तथा मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. स्वप्निल सांगळे यांनी अचानक रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. या पाहणीत रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचे तसेच रु

.

भेटीदरम्यान रुग्णांना औषधे न मिळणे, वेळेवर डॉक्टर उपलब्ध नसणे, साधारण रुग्णांनाही जिल्हा रुग्णालयात रेफर करणे, तसेच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न होणे अशा विविध समस्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख शरद पगार यांनी डॉ. सांगळे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी उपस्थित नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांनीही तक्रारी मांडल्याने डॉ. सांगळे यांनी रुग्णालयाची सखोल तपासणी केली. तपासणीदरम्यान नाशिक स्तरावरून पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध नसल्याचेही स्पष्ट झाले.

या प्रकरणी सखोल चौकशी करून आवश्यक कागदपत्रांसह स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्याच्या सूचना डॉ. सांगळे यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या. तसेच आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश चौकशी समितीला देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णालयातील गैरप्रकार थांबून रुग्णांची होणारी हेळसांड कमी होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

समिती जिल्हा रुग्णालय नाशिक येथील औषध खरेदी, पुरवठा, विनियोग तसेच अधिनस्त संस्थांना होणाऱ्या औषध पुरवठ्याची तपासणी करून तुलनात्मक अहवाल सादर करणार आहे.मागणीनुसार पुरवठा न झाल्यास संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची शिफारसही समिती करणार आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी शासन नियमांनुसार काम करावेत, रुग्णांना विनाकारण रेफर करण्याचे प्रकार थांबवावेत, वेळेवर औषधसाठा उपलब्ध करून द्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा तालुकाप्रमुख शरद पगार यांनी दिला आहे.रुग्णालयातील समस्या मार्गी लागाव्यात, अशी मागणी होत आहे.

डॉ. स्वप्नील पाटील : प्रभारी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, धुळे – अध्यक्ष, डॉ. आकाश चौधरी : अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव – सहअध्यक्ष, भाऊलाल वाघ : औषध निर्माण अधिकारी धुळे – सदस्य, महेश वेंडाळे : औषध निर्माण अधिकारी जळगाव – सदस्य, तेजस पाटील : वरिष्ठ लिपिक जळगाव – सदस्य या पाच अधिकाऱ्यांचा चौकशी समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *