![]()
मूर्तिजापूर आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर येथील नगरपरिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी आढावा सभा नुकतीच संपन्न झाली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी प
.
या महत्त्वपूर्ण बैठकीस शहर, ग्रामीण व माना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह कृषी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाटबंधारे आणि जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणांनी मिळून चोख उपाययोजना कराव्यात, यावर बैठकीत एकमत झाले.
नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवण्याचे निर्देश
बैठकीत अतिवृष्टी, पूरस्थिती, नाल्यांची स्वच्छता, धोकादायक व शिकस्त इमारतींचा प्रश्न, सुरळीत वीज पुरवठा आणि आरोग्य सेवा यांवर सविस्तर चर्चा झाली. साहित्य उपलब्धता, निवारा केंद्रांची तयारी आणि तत्पर संपर्क व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहून त्वरित प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. नियंत्रण कक्ष २४ तास अद्ययावत ठेवावेत व यंत्रसामग्री सज्ज ठेवावी, असे निर्देश तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिले.