![]()
मानेगाव येथे शक्तिपीठ महामार्ग जमिनीची मोजणी करताना विरोध केला म्हणून शेतकऱ्यांवर कारवाई केल्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने निमगाव पाटी येथे राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने शासनाच्या परिपत्रकाची होळीही करण्यात आली. शक्तिपीठ महामार्गला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून विरोध होत असतानाही शासनाने त्यास न जुमानता या बाधित जमिनींच्या उताऱ्यावर या महामार्गाच्या नोंदी केल्या. एवढेच काय या बाधित शेतकऱ्यांच्या हरकती येणे सुरू असतानाच घाईघाईत संयुक्त मोजणी सुरू केली. त्याच्या प्रत्येक तालुक्यातील तारखा निश्चित केल्या. त्यानुसार माढा तालुक्यातील मानेगाव, धानोरे या ठिकाणी प्रत्यक्ष संयुक्त मोजणीचे काम सुरू केल्याने संतप्त झालेल्या या महामार्गावरील माढा, माळशिरस तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी त्यास प्रतिकार केला. असे असताना शासनाने त्यांची बाजू समजून न घेता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत त्यांना स्थानबद्ध केले. हा या बाधित शेतकऱ्यांवर अन्याय असून शासनाची ही हुकूमशाही झाली आहे. निमगाव पाटी येथे केले आंदोलन शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि. ३० रोजी सकाळी पुणे पंढरपूर रोडवर निमगाव पाटी येथे शासनाच्या या कृत्याचा निषेध करत शासनाच्या परिपत्रकाचीही होळी केली. यावेळी शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी आंदोलनात मगन काळे, रामचंद्र काळे, अजित बोरकर या शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Source link
‘स्वाभिमानी’कडून निमगाव पाटी येथे परिपत्रकाची होळी:शक्तिपीठ विरोधी शेतकऱ्यांवर कारवाईचा निषेध