Headlines

परभणी-हिंगोली विधान परिषद:ठाकरे गटाकडून डॉ. विवेक नावंदर यांना उमेदवारी जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, उद्या भरणार अर्ज




परभणी-हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे परभणी महानगर प्रमुख डॉ. विवेक नावंदर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी परभणी हिंगोली मतादारसंघासाठी डॉ. विवेक नावंदर यांच्या नावाची घोषणा केली आहे. आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करून नावंदर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. सोमवारी ता. 1 सकाळी साडेदहा वाजता उमेदवारी दाखल करणार आहेत. आता महायुतीच्या उमेदवाराच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. परभणी-हिंगोली विधान परिषदेची जागा ठाकरे गटाची असल्याचे या ठिकाणी ठाकरे गटाने आपला दावा सांगितला होता. त्यानंतर महाविकास आघाडीमधील काँग्रेस पक्षाने ही जागा आपल्याला सोडावी अशी मागणी केली होती. मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटाने परभणी-हिंगोलीची जागा आपल्याकडेच ठेवली आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाकडून कोण निवडणुक लढविणार यावर चर्चा सुरु झाली होती. ठाकरे गटाचे हिंगोली जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती तर डॉ. नावंदर यांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळावी, असा दावा पक्षाकडे केला होता. त्यानंतर आज डॉ. नावंदर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. अंबादास दानवेंची पोस्ट काय? अंबादास दानवे यांनी X वर पोस्ट करत म्हटलंय की, हिंदुहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परभणी महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांची परभणी – हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक – 2026 साठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात येत आहे.

दरम्यान, डॉ. नावंदर हे ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक मानले जातात. सन 2006 ते सन 2010 पर्यंत ते ठाकरे गटाचे परभणी शहर प्रमुख होते त्यानंतर सन 2017 ते सन 2025 पर्यंत त्यांनी जिल्हा सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहिले आहेत. तर मागील काही दिवसांपूर्वीच त्यांची महानगर प्रमुख म्हणून निवड झाली. परभणी नगर पालिका निवडणुकीत महाविकास आघाडीची योग्य मोट बांधत त्यांनी परभणी नगर पालिकेवर महाविकास आघाडीचा अध्यक्ष विराजमान केला आहे. त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली असून सोमवारी ता. 1 सकाळी साडेदहा वाजता ते उमेदवारी दाखल करणार आहेत. सर्वच पक्षातील मतदारांशी चांगले संबंध- डॉ. विवेक नावंदर महाविकास आघाडी सोबतच इतर पक्षातील मतदारांशी आपले चांगले संबंध आहेत. आता पर्यंत इतरांसाठी निवडणुकीचे काम केले होते आता आपल्यासाठी निवडणुकीचे काम करण्याची संधी पक्षाने दिली आहे. सर्वच पक्षातील मतदरांशी असलेल्या वैयक्तिक संबंधांवर आपण हि निवडणुक जिंकणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *