![]()
प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा-कोल्ही शिवारात रविवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे येथून धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने वैजापूरमार्गे जाणाऱ्या सिल्लोड-नाशिक बसला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जण जखमी झाले असून, दोन गंभीर आहे.सिल्लोड आगाराची बस (एमएच २० बीएल ३७७९) नाशिककडे जात होती. यावेळी वळणावर समोरून येणाऱ्या कारने (एमएच १२ एफके ९२२०) ने बसला समोरून धडक दिली. यात कारमधील ५ जण जखमी झाले. जखमी घोरपडीचे रहिवासी कारमधील विजय फुला रेड्डी (४७), धनंजय पाटील (५२), ललिता पाटील (४८), उर्मिला धनंजय पाटील (४०) (सर्व रा. घोरपडी, पुणे) आणि कोकीळाबाई प्रभाकर सोनार (६५, रा. हर्सूल, धुळे) हे पाच जण तर बसचालक किरकोळ जखमी आहे.
Source link
वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रणसुटल्याने कार एसटी बसला धडकली:वैजापूरच्या खंडाळा-कोल्ही शिवारात अपघात, कारमधील पाच जण जखमी