![]()
प्रतिनिधी | पैठण पैठण येथील नाथसागर धरणात रविवारी (३१ मे) पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांपैकी बेपत्ता असलेल्या दुसऱ्या तरुणाचा मृतदेह सोमवारी (१ जून) सकाळी शोध पथकाला आढळून आला. त्यामुळे या दुर्दैवी घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सात मित्र धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. या वेळी पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या संकेत सिद्धार्थ खरात (१८) व अनिकेत मनू भारती (१९, रा. अंबिकानगर, गल्ली क्र. ७, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. घटनेनंतर रविवारी सायंकाळी संकेत खरात याचा मृतदेह शोध पथकाने बाहेर काढला होता. मात्र, अंधार पडल्याने अनिकेतचा शोध थांबवण्यात आला होता. सोमवारी सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली होती.
Source link
नाथसागरातील बेपत्ता दुसऱ्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला:दुर्दैवी घटनेतील मृतांची संख्या दोन