Headlines

दृष्टिहीन भगिनी व जावयांना अधिक मासानिमित्त स्नेहभोजन:सेवा मित्र मंडळातर्फे कस्तुरे चौकातील मंदिरात आयोजन




अधिक मासानिमित्त दृष्टिहीन भगिनी व त्यांच्या जावयांसाठी सामूहिक स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवार पेठेतील कस्तुरे चौकातील विठ्ठल मंदिरात हा कार्यक्रम पार पडला. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाऊ म्हणून हा आनंद सोहळा आयोजित केला होता. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे दरवर्षी दृष्टिहीन जोडप्यांचे लग्नसोहळे आयोजित केले जातात. यावर्षी सेवा मित्र मंडळ आणि शिरीष मोहिते यांच्या सहकार्याने अधिक मासात जावई स्नेहभोजन, अधिक मास वाण आणि पोषाख प्रदान कार्यक्रम घेण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सागर पवार, विजया सागर पवार आणि कनिष्क सागर पवार यांच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते आणि डॉ. मिलिंद भोई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपत हा अधिक मासाचा सोहळा साजरा करण्यात आला. वैशाली भोई, वंदना मोहिते, ज्योती ढमाळ, विद्या बावधनकर, रोहिणी चेन्नूर आणि श्रध्दा गोरे यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. यावेळी बोलताना विजया पवार म्हणाल्या, “अधिक मास हा सेवा, दान आणि समाजहिताच्या कार्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या निमित्ताने दृष्टिहीन भगिनींसोबत स्नेहभोजनाचा आनंद वाटून घेण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला आनंद आहे.” स्नेहभोजन झाल्यानंतर सर्वांना घरचा आहेर म्हणून भेटवस्तू देण्यात आल्या. सेवा मित्र मंडळ आणि लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या सहकार्याने गेल्या अनेक वर्षांपासून दृष्टिहीन व दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये अनेक दिव्यांग जोडप्यांचे सामूहिक विवाह संपन्न झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *