Headlines

खंडाळ्यातील दोन शेतकरी मुलांची भारतीय सैन्य दलात झाली निवड:गौरव, कृष्णा यांनी जिद्द न सोडता तिसऱ्या प्रयत्नात मारली बाजी‎




वैजापुर तालुक्यातील खंडाळ्यातील सावतावाडी येथील सर्व साधारण शेतकरी कुटुंबातील गौरव अर्जुन मगर आणि कृष्णा गोकुळ थोरात या दोघांची भारतीय सैन्यात नुकतीच निवड झाली आहे. दोन वेळा भरतीसाठी केलेल्या प्रयत्नात अपयश आले तरी खचुन न जाता पुन्हा जोमाने भरतीची तयारी करत आपल्याला यश मिळेलच ही भावना मनात धरून तिसऱ्या प्रयत्नात गौरव व कृष्णा या दोघांनी भारतीय सैन्य दलात आपली जागा मिळवली. दोघांनी देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले होते. भरती प्रक्रियेदरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सलग अपयश आले, मात्र त्यांनी कधीही जिद्द सोडली नाही. अखेर तिसऱ्या प्रयत्नात यशाला गवसणी घालत भारतीय सैन्यात स्थान निश्चित केले. सैन्य दलात निवड होणे ही स्वाभिमानाची गोष्ट Ãशेतकरी कष्टाने शेती पिकवतो . शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. सुलतानी आणि अस्मानी संकट शेतकऱ्याच्या उंबरठ्यावर नेहमी दस्तक देत असते. एव्हढे असूनही माझा मुलगा गौरव याने मला शेतीत मदत करून भरतीची तयारी केली. भारतीय सैन्य दलात त्याची निवड झाली ही आमच्यासाठी स्वाभिमानाची गोष्ट आहे. -अर्जुन मगर- गौरवचे वडिल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *