![]()
एरंडोल तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने रस्त्यावर केवळ मोठे दगड आणि खडी टाकून रस्ता कच
.
पिंपरी बुद्रुक गावाकडे जाणाऱ्या या रस्त्यावर सध्या सर्वत्र सैल आणि मोठे दगड पसरलेले आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांची वाहने वारंवार घसरत असून, दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. या धोकादायक रस्त्यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात सापडला आहे. शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या खडतर रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत असून, त्यांचा शैक्षणिक प्रवास त्रासदायक ठरत आहे. आता पावसाळा तोंडावर आला असून, जर येत्या काही दिवसांत हा रस्ता दुरुस्त केला नाही, तर पावसाच्या पाण्यामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होईल. पर्यायाने गावाची वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची आणि बिकट होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली.
संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम अर्धवट आणि अत्यंत निष्काळजीपणे करून ठेवले असल्याचा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पावसाळा सुरू होण्यास आता काहीच दिवस शिल्लक आहेत. पहिल्याच पावसात हा कच्चा रस्ता वाहून जाण्याचा व चिखल होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच संबंधित विभागाने आणि ठेकेदाराने तात्काळ लक्ष देऊन हे काम पूर्ण करावे, अशी मागणी जोर धरत आहे.