Headlines

सोलापुरात नात्याला काळिमा:काकाकडून 5 वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून, खेळताना पत्र्यावरून पडल्याचा केला होता बनाव




दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावातून नात्याला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे काकानेच आपल्या अवघ्या 5 वर्षांच्या सख्ख्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे. समर्थ यल्लाप्पा कास्तार असे मृत चिमुरड्याचे नाव आहे. या क्रूर कृत्याप्रकरणी संशयित आरोपी काका अंकुश परसप्पा कास्तार याच्या विरोधात मंद्रूप पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत समर्थचे आई-वडील दोघेही ऊसतोड कामगार आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते सतत बाहेरगावी असतात. त्यामुळे चिमुरडा समर्थ हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर येथील आपल्या आजीजवळ राहत होता. 4 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास समर्थ हा मी खेळायला जातो, असे आजीला सांगून घरातून बाहेर पडला होता. पत्र्यावरून पडल्याचा रचला खोटा बनाव! समर्थ घरातून बाहेर पडल्यानंतर काही वेळाने त्याचा काका अंकुश कास्तार हा त्याला बेशुद्धावस्थेत कडेवर घेऊन घरी आला. समर्थ खेळताना घराच्या पत्र्यावरून खाली पडला आणि त्यामुळे तो बेशुद्ध झाला आहे, असा बनाव नराधम अंकुशने कुटुंबीयांसमोर केला. समर्थच्या नातेवाईकांनी काकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत कोणतीही शंका न घेता त्याला तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती समर्थचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक सत्य उघड रुग्णालयात समर्थचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्याला, गळ्यावर आणि हनुवटीवर काही संशयास्पद जखमांच्या खुणा दिसून आल्या. यामुळे घातपाताचा संशय बळावल्याने पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या शवविच्छेदन अहवालात समर्थचा मृत्यू पत्र्यावरून पडल्याने झालेला नसून, त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, तपास सुरू शवविच्छेदन अहवाल समोर येताच मंद्रूप पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून कुटुंबाची दिशाभूल करणाऱ्या आणि घटनेनंतर संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या काका अंकुश कास्तार याला अटक केली. मात्र, एका 5 वर्षांच्या निष्पाप पुतण्याचा जीव घेण्याइतपत काकाच्या मनात नेमका कोणता राग होता? या क्रूर हत्येमागील मुख्य कारण काय? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मंद्रूप पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *