![]()
अंबडचा लाचखोर तहसीलदार विजय चव्हाणच्यालग्नाचा शनिवारी वाढदिवस होता. परंतु केककापण्यापूर्वीच तो लाचखोरीच्याजाळ्यात अडकला. या कारवाईमुळेअंबड तालुक्यातील वाळू तस्करांनीरविवारी अघोषीत बंद पाळला.गोदापट्ट्यात वाळूचा उपसा करणारेसुमारे २०० हायवा रविवारी बंद होते.उद्या ९ जूनला वाळू उपशाची मुदतसंपणार आहे. एका दिवसासाठीकारवाईचा धोका नको म्हणून तस्करांनी वाळू उपसा बंदठेवला होता. लाचखोर तहसीलदार विजय चव्हाणयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील घरात ९ तोळे सोने,८० ग्रॅम चांदी, १.८ लाखाची रोकड आढळली. वाळू तस्करीचे सर्वाधिक ८६ गुन्हे अंबडला दाखल : जालना जिल्ह्यात अवैध वाळूवाहतूकप्रकरणात गेल्यावर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्येसर्वाधिक ८६ प्रकरणे अंबड तालुक्यातील आहेत.अंबडमधील वाळू तस्करांना २ कोटी ४० लाखांचा दंडआकारण्यात आला आहे. ३५ गुन्हे दाखल झाले आहेत.भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार २०२५-२६मध्ये जालन्यात ३५ वाळूघाटांसाठी बोली लागली. यातून शासनाला १३ कोटी ८८ लाखांचा महसूल मिळाला. या घाटांतून क्षमतेपेक्षा अधिक उपसा झाला आहे. २०० हायवांद्वारे दिवसाला २.१० कोटींची उलाढाल अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा याभागातील गोदापट्ट्यात दररोज सुमारे२०० हायवा वाळूचा उपसा करतात.प्रत्येक हायवा दिवसाला किमान ३ट्रीप उपसा करतो. हायवात ५ ब्रासवाळू बसते. या हिशोबाने १ हायवादिवसाला १५ ब्रास वाळू उपसतो. तर२०० हायवा दिवसाकाठी ३००० ब्रासवाळू काढतात. एक ब्रास वाळूचीकिंमत सुमारे ७००० रुपये असते.त्यानुसार दिवसाला २ कोटी १०लाखांची उलाढाल होते. त्यामुळेतस्करांकडे प्रचंड पैसा येतो. लाचखोराच्या नावावर संभाजीनगरात रो-हाऊस चव्हाण याच्या छत्रपतीसंभाजीनगर येथील निवासस्थानीझडती घेण्यात आली. या झडतीत१ लाख ८ हजार ८०० रुपयांचीरोकड, ९ तोळे सोन्याचे दागिने,८० ग्रॅम चांदी, १०० इंची टीव्ही,अत्याधुनिक ड्रोन कॅमेरा, लॅपटॉपजप्त केला. चव्हाणच्या नावावरसंभाजीनगरातील उच्चभ्रू भागातएक रो-हाऊस, फ्लॅटअसल्याचेही तपासात समोरआले आहे. त्याला न्यायालयाने २दिवसांची पोलिस कोठडी दिली. पुढे काय? – संपत्तीसह गुंतवणुकीची चौकशी तहसीलदार चव्हाण याने सध्याचा त्याचा फ्लॅट गहाण ठेवून कर्ज घेतलेलेआहे. त्याने अन्यत्र कुठे गुंतवणूक केली आहे का, उत्पन्नापेक्षा त्याचीसंपत्ती किंवा इतर कुठे अधिकची गुंतवणूक आहे का, याची एसीबीकडूनचौकशी केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. नांदेडला जि.प. निवडणूकलढण्याची कुटुंबाची तयारी लाचखोर तहसीलदार चव्हाणच्यालग्नाचा शनिवारी वाढदिवसअसल्याने त्याचे नातेवाईक जमलेहोते. कार्यक्रमानंतर कुटुंबासहहॉटेलमध्ये जेवणाला जाण्याचेहीत्याचे नियोजन होते. तत्पूर्वी लाचेचीरक्कम स्वीकारण्याचा मोह त्यालानडला. त्याने पैसे घेण्यासाठीआठवेळा लोकेशन बदलले होते.अखेरीस तो लाचलुचपतप्रतिबंधकविभागाच्या जाळ्यात अडकला.कंधार (जि.नांदेड) तालुक्यातीलफुलवळ जि.प. गटाची निवडणूकलढवण्यासाठी त्याचे कुटुंबियजोरदार तयारी करत होते. मात्र,लाचेची कारवाई झाल्यामुळे आतात्याच्या कुटुंबाच्या राजकीयतयारीला सुरुंग लागला आहे.
Source link
लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापण्यापूर्वी तहसीलदार लाच घेताना जाळ्यात:कारवाईनंतर दुसऱ्या दिवशी झडती, सापडले मोठे घबाड