![]()
नागपूरजवळील कामठी परिसरातील कन्हान नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. यात ६ वर्षीय चिमुकला चैतन्य बबलू अंबादे, गौतम राजकुमार अंबादे (३१) आणि रोहित कैलास नागदेवे (३३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या जरीपटका भागातील अंबादे आणि नागदेवे कुटुंबातील काही जण रविवारची सुटी घालवण्यासाठी कामठी येथील प्रसिद्ध शिवमंदिर परिसराजवळून वाहणाऱ्या कन्हान नदीच्या किनाऱ्यावर गेले होते. उन्हाचा कडाका आणि सुटीचा आनंद घेत सर्वजण नदीपात्राच्या बाजूला सहलीचा आनंद घेत होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास नदीत उतरल्यानंतर पाण्याचा आणि तिथल्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे एक जण बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या नादात कुटुंबातील इतर सदस्यही पुढे सरसावले, मात्र पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे आणि दलदलीसारख्या परिस्थितीमुळे एकापाठोपाठ एक तिघे जण खोल पाण्यात वाहून गेले.
Source link
नागपूरच्या कामठी येथील कौटुंबिक सहलीचा भीषण शेवट:कन्हान नदीत सहा वर्षीय चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील तीन जण वाहून गेले