![]()
तीव्र पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्यासाल्हेर येथील महिलांनी रविवारी(दि. ७) थेट ग्रामपंचायतकार्यालयाला कुलूप ठोकतप्रशासनाविरोधात आक्रमक पवित्राघेतला. पिण्याच्या पाण्यासाठीवणवण भटकंती करावी लागतअसताना ग्रामपंचायत कार्यालयातएकही जबाबदार अधिकारी अथवाकर्मचारी उपस्थित नसल्यानेमहिलांचा संताप अनावर झाला.//”पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खालीकरा,” अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला. साल्हेर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैलभटकंती करावी लागत असूननागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर गावातील महिलाआपल्या व्यथा मांडण्यासाठीग्रामपंचायत कार्यालयात पोहोचल्या.मात्र, तेथे कोणताही जबाबदारअधिकारी अथवा कर्मचारी उपस्थितनसल्याचे दिसून आले. यामुळेमहिलांचा रोष आणखी वाढला.यानंतर संतप्त महिलांनी ग्रामपंचायतकार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारालाकुलूप ठोकून निषेध व्यक्त केला. २४ तासांत पाणी द्या,अन्यथा तीव्र आंदाेलन २४ तासांत पिण्याच्या पाण्याचीव्यवस्था न झाल्यास आंदोलनअधिक तीव्र करण्यात येईल, असाइशाराही महिलांनी प्रशासनालादिला आहे. या आंदोलनामुळेबागलाण तालुक्यात पाणीप्रश्न पुन्हाऐरणीवर आला आहे.
Source link
साल्हेर ग्रामपंचायतीला महिलांनी लावले कुलूप:पाणीटंचाईने वाढला संताप; अधिकारी-कर्मचारी अनुपस्थित आढळल्याने जोरदार घोषणाबाजी