Headlines

खडक माळेगाव, टाकळी विंचूरला दोन बिबटे जेरबंद:शेतकऱ्यांच्या मदतीने वन विभागाने राबविली माेहीम‎




निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथे बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी (दि.८) शिंदे वस्ती परिसरात आढळलेल्या एका बिबट्याला वन विभागाने सुरक्षितरित्या जेरबंद केले, तर दुसरा बिबट्या सायंकाळी टाकळी विंचूर येथे जेरबंद करण्यात आला. दरम्यान, दोन शेतकरी आणि वन विभागाच्या एका कर्मचाऱ्यावर बिबट्याने किरकोळ हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. खडक माळेगाव येथील शेतकरी रामेश्वर शिंदे यांच्या शेत परिसरात बिबट्या फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत कांदा साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी जाळीच्या साहाय्याने त्याला सुरक्षितपणे अडवून ठेवले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला कोणतीही इजा न होता पकडण्यासाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले आणि त्यानंतर त्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले. दरम्यान, टाकळी विंचूर हद्दीतील काळे वस्ती परिसरात आणखी एक बिबट्या आढळून आला. वन विभाग आणि स्थानिक शेतकऱ्यांनी दिवसभर शोधमोहीम राबवून सायंकाळी त्याला जेरबंद केले. खडक माळेगाव आणि परिसरात बिबट्यांचा वावर वाढत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. टाकळी विंचूर येथे पकडलेल्या बिबट्यावर लासलगावच्या पशु वैद्यकीय अधिकारी पूजा देशमुूख यांनी उपचार केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *