Headlines

थरार:वाळू माफियांप्रमाणेच गुटखा किंगही ठेवत आहेत पथकांवर वॉच; संभाजीनगरच्या रहीमपुरात थेट महिला अधिकाऱ्यावर हल्ला




शहरात सध्या अन्न व औषध प्रशासनाने गुटखा माफियांच्या विरोधात जोरदार कारवाईचा धडाका लावला आहे. मात्र, या कारवाईमुळे धास्तावलेल्या गुटखा सिंडिकेटमधील मंडळींनी आता थेट वाळू माफियाप्रमाणेच कृती करत शासकीय अधिकाऱ्यांच्या हालचालींवर पाळत ठेवण्यास सुरुवात केली आहे. कोट्यवधी रुपयांचे काळे अर्थकारण यामागे असल्याने, कुणाचा जीव घेण्यासाठीही ही कुख्यात मंडळी मागे-पुढे पाहत नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. असाच एक थरारक प्रकार सोमवारी मध्यरात्री वाळूज परिसरातील रहीमपूर भागात घडला. कर्तव्य बजावणाऱ्या पथकावर प्राणघातक हल्ला करून जप्त केलेला मुद्देमाल पळवून नेणाऱ्या माफियांच्या विरोधात वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला अधिकाऱ्यांच्या अंगावरच कार घालण्याचा माफियाचा प्रयत्न गडबडीचा अंदाज घेत पथकाने टेम्पो ताब्यात घेत वाळूज पोलिस स्टेशनचे पीआय शिवचरण पांढरे यांना फोन करून तातडीने पोलिस मदत मागवली. या वेळी स्कॉर्पिओ चालकाने गाडी थेट पथकातील अधिकाऱ्यांच्या अंगावर घातली. जीव वाचवण्यासाठी तिघे जण वेगवेगळ्या दिशेला पळाले. प्रज्ञा सुरसे यांना पळता आले नाही. तेव्हा चालकाने गाडी पुन्हा वळवली. त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने थेट त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी पथकामध्ये भीती निर्माण झाली तसेच या गोंधळाचा फायदा घेऊन स्कॉर्पिओमधील एक जण आयशर टेम्पोमध्ये बसला. त्याने कारवाई करत असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांनी भरलेला टेम्पो भरधाव वेगाने पळवून नेला. स्कॉर्पिओची एन्ट्री अन् मोठा गोंधळ घटनास्थळी आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतील लोकांनी मोठ्याने आरडाओरडा केला. पथकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गाडीतील काहींनी “यांना गोळ्या घाला रे, गोळ्या घाला” असा आरडाओरडा करून धमक्या दिल्या. माफियांनी इतरांशी संपर्क केला कारवाईची भनक लागताच पथकावर पाळत ठेवून फेऱ्या मारणाऱ्यांनी इतरांना मोबाइलवरून संपर्क केला. या वेळी काही जण दुचाकी तर काही जण कारमधून घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली. पथकाला संशय आला.
पथकाने गुटख्याचा ट्रक तपासला रात्री ०१:१५ वाजता पथक घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना एक आयशर टेम्पो (एमएच १६ सीडी ८२९६) उभा दिसला. टेम्पोमध्ये चालक नव्हता. मात्र, तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित अन्नपदार्थांची २५ ते ३० पोती आढळली. माफियांनी थेट ट्रक पळवून नेला अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने सध्या मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या भागात माल पोहोचवण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी मोठा माल पोहोचवण्याऐवजी विभागून मालाची डिलिव्हरी करण्यात येत आहे. यात प्रत्येक भागात काही प्रमाणात तरी साठा पोहोचावा यासाठी टप्पे पाडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ८० रुपयांना मिळणारी गुटख्याची एक पुडी आता १३० ते १४० रुपयांच्या घरात पोहोचली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *