Headlines

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची केली विचारपूस:वेरूळचा विकास म्हणजे स्वच्छता व पुनर्वसन: जिल्हाधिकारी गौडा यांची ग्वाही‎




वेरूळ जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी आज पिंपरी (ता. कन्नड) या गावास भेट दिली. येथे त्यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली व जनगणना कार्याची पडताळणी केली. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी. एम, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन तसेच अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी गौडा यांनी पिंपरी या गावातील विष्णू काशीनाथ जोगदंड या दिवंगत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या कुटुंबाला विविध शासकीय योजनांचे देण्यात आलेले लाभ, त्यांची सद्य:स्थिती याबाबत विचारपूस केली. जनगणना कार्याची पडताळणी ही जिल्हाधिकारी गौडा यांनी केली. बाबुलाल भाऊलाल कुदळे यांच्या कुटुंबाची गणना झाल्याची खात्री त्यांनी अॅपवर करून खात्री केली. त्या कुटुंबाला देणार विविध योजनांचा लाभ बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, वेरूळ लेणी व मंदिर परिसरातील कोणत्याही दुकानदारावर अन्याय होणार नाही. सर्व अतिक्रमणधारक व दुकानदारांचे आधी पुनर्वसन केले जाईल, त्यानंतरच ‘मगच वेरूळ विकास आराखडा’ राबवण्यात येईल. कोणालाही बेघर न करता सर्वांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करू, असे आश्वासन त्यांनी दिले. “ संपूर्ण गाव, स्वच्छ रस्ते, शुद्ध हवा, पाणी व येथे आल्यावर मनाला समाधान वाटेल असा परिसर निर्माण करणे म्हणजेच खरा विकास,” असे गौडा यांनी सांगितले.
वेरूळ | जगप्रसिद्ध वेरूळ येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी विकास म्हणजे केवळ मोठमोठ्या इमारती व लक्झरी घरे नव्हे, तर स्वच्छ परिसर, शुद्ध वातावरण आणि मन प्रसन्न करणारे शहर म्हणजे खरा विकास होय, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज वेरूळ येथे मांडली. नियोजित दौऱ्यानुसार जिल्हाधिकारी गौडा यांनी वेरूळला भेट देऊन स्थानिक दुकानदारांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी वेरूळ लेणी परिसर व घृष्णेश्वर मंदिर परिसरातील विकास कामांचा आढावा घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *