![]()
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा ४ हजार ३९९ दिवसांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे. आतापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांपेक्षा सर्वाधिक काळ या पदावर विराजमान राहण्याचा ऐतिहासिक टप्पा त्यांनी पार केला. या सुवर्ण क्षणाचे औचित्य साधून भाजप विद्यापीठ मंडळाच्या वतीने श्री पंचवटी हनुमान मंदिर येथे आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि देशाच्या अखंड प्रगतीसाठी भगवंताच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली. मंदिरात भक्तिमय वातावरणात सर्वांच्या हस्ते आरती झाल्यानंतर उपस्थित भाविक आणि कार्यकर्त्यांना प्रसाद वितरण करण्यात आले. या मंगलमयी आणि उत्साही वातावरणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला भाजपचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, महिला मोर्चा आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने किशोर दुचके, रमेश टेंबरे, अंकेश वर्मा, अक्षय वेळूकार, अक्षय मुळे, दत्ता कहाळे, श्नवल चव्हाण, पवन शर्मा, रोशन जयस्वाल, नितीन राजगुरे, शशांक माने, रेखा मौर्य, गीता बोज्जे यांच्यासह विद्यापीठ मंडळाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते बंधू-भगिनी उपस्थित होते.
Source link
पंतप्रधानांच्या विक्रमी कार्यकाळाबद्दल हनुमान मंदिर येथे भाजपकडून आरती:उपस्थित भाविक आणि कार्यकर्त्यांना प्रसादाचे केले वितरण, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती