Headlines

अकोटमधील जिल्हा परिषद शाळा परिसर बनला समाजकंटकांचा अड्डा:विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडसर, आरोग्याचा प्रश्न गंभीर‎



कोणे एकेकाळी अकोट शहराची शैक्षणिक क्षेत्रात अधिकारी घडवणारी शाळा म्हणून ‘जहागीरदार’ जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचा नावलौकिक होते. मात्र आज याच शाळेच्या आवाराची कमालीची दुरवस्था झाली आहे. या ऐतिहासिक शाळेच्या आवाराचा मोठ्या प्रमाणावर दुरुपयोग होत असल्या

.

जिल्हा परिषद मराठी व उर्दू माध्यमाच्या या माध्यमिक शाळेला शहराच्या मध्यभागी खूप मोठे आवार आहे. वास्तविक या भव्य मैदानाची क्रीडांगण म्हणून निर्मिती करून विद्यार्थ्यांसाठी क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र, विकास तर दूरच, या मैदानाचा उपयोग आता सार्वजनिक खुले शौचालय म्हणून होत आहे. स्थानिक नागरिक व बाजारातील दुकानदार रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या सुमारास येथे उघड्यावर शौचास बसतात. दिवसभर येणारे-जाणारे नागरिक येथे राजरोसपणे लघुशंका करतात. यामुळे संपूर्ण शाळा परिसरात दुर्गंधी पसरली आहे. विद्यार्थी व शिक्षकांना नाक दाबून वर्गात बसावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.

यापूर्वी या जिल्हा परिषद शाळेला सुरक्षित संरक्षक भिंत होती. मात्र, परिसरात अतिक्रमणधारकांनी ही भिंत पाडून टाकली. आता याच तुटलेल्या भिंतींमधून आजूबाजूचे नागरिक व टवाळखोर थेट शाळेच्या आवारात ये-जा करतात. रात्री शाळेच्या संरक्षणासाठी एकही चौकीदार नाही. त्यामुळे समाजकंटकांना रात्रीच्या वेळी हुल्लडबाजी करण्यासाठी पूर्णपणे रान मोकळे मिळाले आहे. वर्गखोल्यांच्या खिडक्यांजवळ रानटी वनस्पती, वेली, बाभळीची झाडे वाढली आहेत. या वाढलेल्या झाडाझुडपांमुळे वर्गांमध्ये येणारा नैसर्गिक उजेड व हवा पूर्णपणे बंद झाली आहे. दिवसाढवळ्या वर्गखोल्यांत अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे विद्यार्थ्यंच्या दृष्टिने प्रशासनाने तातडीने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. ज्या आवारात ही दुरवस्था झाली आहे, त्याच परिसरात गटशिक्षणाधिकारी यांचे मुख्य कार्यालय व तालुका संसाधन केंद्र आहे. तसेच राज्य मंडळाच्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळी अत्यंत गोपनीय व महत्त्वाचे असणारे ‘कस्टडीयन कार्यालय’ देखील याच ठिकाणी आहे. सर्व शाळांच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण, उत्तरपत्रिकांचे संकलन याच संवेदनशील आवारातून केले जाते. जलसंपदा विभागाचे ‘सहाय्यक अभियंता श्रेणी-१, लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग क्र. ७, अकोट’ यांचेही शासकीय कार्यालय आहे. दोन-दोन महत्त्वाच्या शासकीय यंत्रणा डोळ्यांदेखत असतानाही शाळेच्या या दुरवस्थेकडे डोळेझाक होत आहे.

आवारात गटशिक्षणाधिकारी कार्यालय, तरीही प्रशासन सुस्त

वरिष्ठांना माहिती दिली ^जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला भेडसावणाऱ्या समस्या, टवाळखोरांचा त्रास व तुटलेल्या संरक्षक भींतीबाबत अनेकदा वरिष्ठ कार्यालय व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून ठोस कारवाई आली नाही. वरिष्ठांनी आतातरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने विचार करून निर्णय घ्यावा. – फिरोज खान, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, अकोट.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *