Headlines

सुनेत्रा पवारांच्या विमानात तांत्रिक बिघाड:सुप्रिया सुळेंकडून चिंता व्यक्त, म्हणाल्या – असे झाले असेल तर हा चिंताजनक विषय




पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अभिजीत दिपके यांच्यातील कथित भेट तसेच सुनेत्रा पवार यांच्या विमान प्रवासादरम्यान झालेला तांत्रिक बिघाड, या दोन्ही चर्चिलेल्या मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “सुनेत्रा वहिनींनी प्रवास केलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती जर खरी असेल, तर मला नक्कीच वहिनींची, पार्थची आणि तटकरेंची काळजी वाटते,” असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी कौटुंबिक संवेदनशीलता दाखवली. तसेच संजय राऊतांनी केलेल्या एका खळबळजनक दाव्याची आपण स्वतः फोन करून माहिती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी मुंबईहून दिल्लीला जाताना ‘व्हीएसआर ऑपरेटिंग कंपनी’च्या विमानाने प्रवास केल्याचे वृत्त समोर आले होते. या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाणाला दोन तास उशीर झाला होता. भूतकाळात अजित पवार यांचा याच कंपनीच्या एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर माध्यमप्रतिनिधींनी सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या: “सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानाने गेल्या होत्या की नाही, याची मला पूर्ण कल्पना नाही. पण जर असे झाले असेल आणि विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला असेल, तर तो अत्यंत चिंताजनक विषय आहे. मी नेहमीच कोणत्याही प्रवास साधनाच्या सुरक्षेबद्दल संसदेत सातत्याने आवाज उठवत असते. त्यामुळे मला वहिनींची आणि सोबत असलेल्यांची काळजी वाटणे स्वाभाविक आहे.” सुप्रिया सुळे म्हणाल्या, “व्हीएसआर कंपनीबद्दल आरोपप्रत्यारोप होत राहतात. पण दोन-तीन महत्त्वाचे मु्द्दे आहेत. सुनेत्रा वहिनी खरंच त्या विमानाने गेल्यात की नाही मला माहिती नाही. कारण पंतप्रधान मोदींनी कमी खर्चाचे आवाहन केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अजुनही खासगी विमानाने किंवा हेलिकॉप्टरने प्रवास करते की नाही याची माहिती नाही,” अभिजीत दिपके आणि मोदी भेटीच्या दाव्यावर राऊतांना फोन करणार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत ‘अभिजीत दिपके आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट झाली होती’ असा एक मोठा दावा केला होता. या दाव्याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडलेली ही माहिती मी देखील ऐकली आहे. या प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय आहे, नक्की काय घडले किंवा त्यांना कोणी काय माहिती पुरवली, या संदर्भात मी स्वतः संजय राऊत यांना फोन करणार आहे आणि त्यांच्याकडून या विषयाची सविस्तर माहिती घेणार आहे.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *