Headlines

अदिती तटकरेंच्या खात्याच्या रचनेत मोठा बदल:तब्बल २३ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर विभागाचे सक्षमीकरण, हजारो पदांच्या पुनर्चनेला मान्यता




महायुती सरकारने तब्बल २३ वर्षांनंतर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सक्षमीकरणाचा निर्णय घेतला आहे. सरकारने या अंतर्गत प्रस्तुत खात्याच्या हजारो पदांच्या पुनर्रचनेला मान्यता दिली आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे विभागाच्या कामकाजास मोठी गती मिळेल, असा ठाम विश्वास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे शनिवारी याविषयी एका विस्तृत पोस्टमध्ये म्हणाल्या, 23 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर विभागाचे सक्षमीकरण : हजारो पदांच्या पुनर्रचनेला मान्यता! महिला व बाल विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांचा सुधारित आकृतीबंध ११ मार्च २०२६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला होता. याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. सन २००३ नंतर, म्हणजेच तब्बल २३ वर्षांनंतर विभागाच्या रचनेत हा मोठा बदल करण्यात आला असून, या ऐतिहासिक निर्णयामुळे विभागाच्या कामकाजास मोठी गती मिळणार आहे. १. बदलत्या गरजा लक्षात घेता, उच्चस्तरीय समितीने प्रस्तावित केलेल्या १६५ नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे. २. विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालयांतील गट-अ ते गट-ड मधील एकूण ८६६९ नियमित पदे , २८४३ बाह्यस्त्रोत पदे तसेच, १,१०,६६४ अंगणवाडी सेविका व १,१०६६४ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण २,२१,३२८ मानधनी पदांना मान्यता दिली आहे. ३. महाराष्ट्र समाज कल्याण बोर्ड, मुंबई येथील १५ कार्यरत आणि ३२ प्रतिनियुक्तीवरील कर्मचाऱ्यांचे आता आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या अधिनस्त रिक्त पदांवर समकक्ष वेतनात समायोजन केले जाणार आहे. सन २००३ पासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लागल्यामुळे विभागाच्या कामकाजाला अधिक कठीण मिळणार आहे. तसेच, ग्रामीण व शहरी भागातील महिला व बालकांसाठीच्या शासकीय योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल हा मला विश्वास आहे. या माध्यमातून विभागातील महा सुधारणा (Mega Reform) टीमचा एक भाग होता आले याचा मला आनंद व अभिमान वाटतो. या सुधारणा समाजातील गरजू, वंचित घटकांसाठी सदैव फलदायी व उपयुक्त ठरतील हा मला विश्वास आहे, असे अदिती तटकरे म्हणाल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *