Headlines

हिंदू जनजागृती समितीतर्फे जिल्ह्यात 15 ठिकाणी सामूहिक “गदापूजन’:युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध ठिकाणी घेतले जात आहेत कार्यक्रम‎



हिंदू जनजागृती समितीच्या वतीने “रामराज्य स्थापनेसाठी” देशभरातील विविध शहरांसह जिल्ह्यातील १५ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ सोहळा उत्साहात संपन्न झाला. सोहळ्यात हिंदू जनजागृती समितीचे अमोल वानखडे म्हणाले की, इतिहासाचे अवलोकन केल्यास असे लक्षात येते की, ज्य

.

​​चांगेफळ बुलडाणा येथील जुना आखाड्याचे महंत रामभारती यांनी, बाळापूरच्या सिद्ध तपे हनुमान मंदिरात हे पूजन करताना गदा पूजानाचे महत्व विषद केले. ​उपमहापौर अमोल घोंगे म्हणाले की, हिंदू जनजागृती समितीचे संस्कृती रक्षणाचे कार्य प्रभावी आहे. विहिंपचे विदर्भ प्रमुख राहुल राठी यांनीही “गदा पूजनाच्या माध्यमातून समितीने सुरू केलेले शौर्य जागृतीचे कार्य स्तुत्य असल्याचे नमूद केले.

सोहळ्यात गदापूजन विधी, श्री हनुमानाची आरती, मारुती स्तोत्रपठण, शंखनाद आणि सामूहिक प्रार्थना करण्यात आली. वातावरणात चैतन्य निर्माण करण्यासाठी ‘श्री हनुमते नम:’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच, ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत’ यावर विशेष प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सर्व भाविकांनी रामराज्य स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेतली. गेली ४ वर्षे समिती अशा प्रकारे सामूहिक गदापूजनाचे आयोजन करत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *