Headlines

सातारा गुन्हेगारी वृत्त:भरधाव दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू; माहुलीत युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण




सातारा तालुक्यातील वासोळे गावाजवळ झालेल्या अपघातात प्रीतम मल्हारी बनसोडे (वय ३६, रा. निगडी, पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २५ मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास सातारा-वाठार मार्गावर वासोळे कमानीजवळ त्यांची दुचाकी भरधाव वेगात असताना नियंत्रण सुटले. रस्त्याच्या कडेला साचलेल्या मुरुमाच्या ढिगाऱ्यावर दुचाकी घसरून अपघात झाला. या घटनेत अक्षय सुरेश देखने यांना किरकोळ दुखापत झाली, तर प्रीतम बनसोडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अक्षय देखने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत. माहुलीत युवकाला लाकडी दांडक्याने मारहाण माहुली येथील विकासनगर परिसरात झालेल्या वादातून देवांश कुमार पासी व त्याचा साथीदार अंशू यांनी अक्षय अरुण खांडेकर यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. दारू पिण्याबाबत टोमणा मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर संशयितांनी अक्षय खांडेकर यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर लाकडी दांडक्याने हात, पाय आणि डोक्यावर मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस हवालदार देशमुख तपास करत आहेत. तीन महिने उपचारानंतर अनोळखी व्यक्तीचा मृत्यू मार्च महिन्यात कणसे किया शोरूम परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी व्यक्तीचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीचे वय अंदाजे ५५ वर्षे असून १६ मार्च रोजी अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने २ जून रोजी त्यांचा मृत्यू झाला. अद्याप त्यांची ओळख पटलेली नसून महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर पुढील तपास करत आहेत. करंजेपेठेतून अल्पवयीन मुलगी बेपत्ता करंजेपेठ परिसरातील एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणी प्रेम यादव, ज्योती यादव, शंकर यादव आणि प्रांजल यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० जून रोजी सकाळी घरातून बाहेर पडलेली मुलगी परत न आल्याने तिच्या वडिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलीला फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक मोहोड तपास करत आहेत. दिव्यनगरीतून १७ वर्षीय तृषा साळुंखे बेपत्ता दिव्यनगरी-कोंडवे परिसरातील तृषा विनायक साळुंखे (वय १७) ही १० जून रोजी घरातून बाहेर पडून बेपत्ता झाली. तिच्या आईने अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत तक्रार दिली आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम सुरू आहे. बांधकामस्थळावरून ३० हजारांचे साहित्य चोरीला वर्ये येथील विठ्ठल मंगलम कार्यालयासमोरील बांधकामस्थळावरून सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या १५ लोखंडी सेंट्रींग प्लेटा चोरीला गेल्या. व्यवस्थापक मनोज सपकाळ यांनी दिलेल्या तक्रारीनंतर अज्ञात चोरट्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार कुमठेकर तपास करत आहेत. महिलेचे मिनीगंठण हिसकावून चोरटे पसार खेड परिसरात कांता माने या दुचाकीवर बसून घरी जाण्याच्या तयारीत असताना भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण हिसकावून नेले. घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहीम राबविली मात्र आरोपींचा माग काढता आलेला नाही. सातारा शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक सावंजी तपास करत आहेत. अनधिकृत वाढदिवस बॅनरप्रकरणी कारवाई कुपर कॉलनी, सदरबाजार चौक आणि पीरवाडी चौक परिसरात विनापरवाना वाढदिवसाचे बॅनर लावल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पाहणीत ही बाब उघडकीस आली. व्यापाऱ्याला पाच दिवस कैद करून खंडणीचा आरोप अवैध सावकारीच्या कथित प्रकरणात आकाश उर्फ तात्या साबळे, नाना चौगुले, प्रतीक पोद्दार आणि अक्षय साबळे यांच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फिर्यादी प्रवीण इंगवले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तीन लाख रुपयांच्या कर्जावर मोठ्या प्रमाणात व्याज वसूल करूनही आरोपींनी आणखी पाच लाख रुपयांची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्याने फिर्यादी आणि त्यांच्या मित्राला पाच दिवस एका बंदिस्त जागेत डांबून ठेवून धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खंडणी, बेकायदेशीर कैद, धमकी तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *