Headlines

नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणाला राजकीय वळण:आरोपींच्या मदतीसाठी 'इस्लाम पार्टी' मैदानात, ही लढाई सुप्रीम कोर्टात गेली तरी लढू- आसिफ शेख




नाशिक येथील बहुचर्चित TCS कॉर्पोरेट जिहाद आणि धर्मांतरण प्रकरणाला आता एक नवे राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुरुवातीला एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आरोपींना आश्रय दिल्याचे उघडकीस आले होते. मात्र, आता या घडामोडींमध्ये मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’ने अधिकृतरीत्या प्रवेश केला असून, त्यांच्याकडून या प्रकरणातील संशयित आरोपींना थेट कायदेशीर मदत पुरविण्यास सुरुवात झाली आहे. आज नाशिक न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान इस्लाम पार्टीचे संस्थापक आणि माजी आमदार आसिफ शेख हे स्वतः जातीने उपस्थित होते. त्यांच्या पक्षाने या खटल्यासाठी एक स्वतंत्र वकील नियुक्त केला असून, त्यांनी न्यायालयात संशयित आरोपी दानिश शेख याची बाजू मांडली. याप्रसंगी आपली भूमिका स्पष्ट करताना आसिफ शेख यांनी घोषित केले की, हे प्रकरण भविष्यात सर्वोच्च न्यायालयात जरी गेले, तरीही इस्लाम पार्टी ही कायदेशीर लढाई पूर्ण ताकदीने लढेल. निदा खान प्रकरणी आरोपी दानिश शेखचे वकील फैज वसीफ यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, न्यायालयात त्यांनी दानिशच्या वतीने बाजू मांडली. यावेळी सरकारी वकील, फिर्यादीचे वकील आणि बचाव पक्ष यांच्यात संयुक्त युक्तिवाद झाला असून अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. दानिशला अटक झाल्यानंतर सुरुवातीला पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, त्याच्या वतीने पहिल्यांदाच करण्यात आलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असल्याची माहिती वकील वसीफ यांनी स्पष्ट केली आहे. सुप्रीम कोर्टात गेले तरी आम्ही उभे राहू- आसिफ शेख या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख म्हणाले, टीसीएस प्रकरण नाशिकमध्ये झाले, त्यात धार्मिक रूप देण्याचा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी सर्व काम करत होते, त्यांच्यात मैत्री होती. त्याला धार्मिक रूप दिले गेले. काही जातीवादी लोकांनी हे काम केले. दानिश शेख याच्या घरचे आमच्याकडे आले, ते घाबरले होते. आम्ही वकील दिला, ते काम पाहत आहेत. माझ्या घराचे कागदपत्र व्यवस्थित आहे. धार्मिक रंग दिला जात असेल तर आम्ही राजकारणी मदत करत होतो. आम्ही पुढे देखील अशी लढाई लढू. ही लढाई नाशिक कोर्टातून सुप्रीम कोर्टात गेली तरी आम्ही आणि इस्लाम पार्टी उभे राहू. पुढील सुनावणी 19 जूनला नाशिकमधील कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धर्मांतरण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्यासह अन्य दोन आरोपींच्या जामीन अर्जावर आता 19 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. आज न्यायालयात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला असून, यापूर्वीही या सुनावणीसाठी दोन वेळा तारीख देण्यात आली होती. आता 19 जून रोजी होणाऱ्या आगामी सुनावणीत सरकारी पक्षाची बाजू पूर्णपणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालय या जामीन अर्जावर आपला अंतिम निकाल सुनावणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *